Sunday, August 31, 2025 06:26:38 AM

Asaram Surrendered In Jodhpur: 235 दिवसांनंतर आसाराम पुन्हा तुरुंगात; जोधपूर मध्यवर्ती कारागृहात केलं आत्मसमर्पण

न्यायाधीश दिनेश मेहता आणि न्यायमूर्ती विनीत कुमार माथूर यांच्या खंडपीठाने आसारामची प्रकृती स्थिर असल्याचे नमूद करत जामिनाची मुदत वाढवण्यास नकार दिला.

asaram surrendered in jodhpur 235 दिवसांनंतर आसाराम पुन्हा तुरुंगात जोधपूर मध्यवर्ती कारागृहात केलं आत्मसमर्पण

Asaram Surrendered In Jodhpur: अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसारामने 30 ऑगस्ट 2025 रोजी जोधपूर मध्यवर्ती कारागृहात आत्मसमर्पण केले. राजस्थान उच्च न्यायालयाने 27 ऑगस्ट रोजी त्याचा अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळल्याने त्याला तुरुंगात परतावे लागले. सकाळी पाल गावातील आश्रमातून बाहेर पडून तो थेट तुरुंगात पोहोचला. न्यायाधीश दिनेश मेहता आणि न्यायमूर्ती विनीत कुमार माथूर यांच्या खंडपीठाने आसारामची प्रकृती स्थिर असल्याचे नमूद करत जामिनाची मुदत वाढवण्यास नकार दिला. जोधपूर एम्सच्या वैद्यकीय मंडळाच्या अहवालात त्याला कोरोनरी धमनीचा आजार असल्याचे, तसेच विशेष नर्सिंग केअर आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, त्याला रुग्णालयात सतत दाखल ठेवण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले गेले.

दोन प्रकरणांत जन्मठेप

अहमदाबादमधील सरकारी रुग्णालयातील तीन डॉक्टरांच्या पथकानेही आरोग्य तपासणी केली होती. न्यायालयाने निरीक्षण केले की गेल्या काही महिन्यांत आसारामने अनेक रुग्णालयांत उपचार घेतले परंतु नियमित वैद्यकीय पाठपुरावा केला नाही. आसारामला दोन वेगवेगळ्या प्रकरणांत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2013 मध्ये जोधपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि दुसऱ्या प्रकरणात गांधीनगर आश्रमातील सुरतमधील महिलेसोबत अत्याचार या आरोपांमध्ये तो दोषी ठरला होता.

हेही वाचा - Arun Gawli : शिवसेना नगरसेवक हत्येप्रकरणी अरुण गवळीला दिलासा; तब्बल 18 वर्षांनंतर जामीन मंजूर

वकिलाचा युक्तिवाद फेटाळला

दरम्यान, 27 ऑगस्टच्या सुनावणीत वकील निशांत बोर्डा यांनी आसारामच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचा दावा करत जामिनाची मुदत वाढवण्याची मागणी केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य न करता वैद्यकीय अहवालावर आधार घेत जामिनाची मुदत न वाढवण्याचा निर्णय कायम ठेवला.

हेही वाचा - Chhatisgarh Crime News : छत्तीसगड हादरलं! बदला घेण्यासाठी शिक्षकाने मिसळलं 426 विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल

मुलाशी भेटीनंतर आत्मसमर्पण

जानेवारी 2025 मध्ये आसारामला 12 वर्षांनंतर पहिल्यांदाच अंतरिम जामीन मिळाला होता. या काळात त्याने मुलगा नारायण साई याची भेट घेतली. शिक्षा भोगत असलेला नारायण साई 25 जून रोजी सुरत तुरुंगातून बाहेर पडून पाल गावातील आश्रमात गेला होता. ही भेट 11 वर्षांनी झाली होती.
 


सम्बन्धित सामग्री