Yogi Adityanath On Brahmos missile
Edited Image
लखनऊ: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी ब्रह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीचे आभासी उद्घाटन केले. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. योगी आदित्यनाथ यांनी ऑपरेशन सिंदूरसाठी सर्व सैनिकांचे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणि संरक्षणमंत्र्यांचे अभिनंदन केले. ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना योदी आदित्यनाथ म्हणाले की, आम्ही ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी 200 एकर जमीन दिली आहे. आता येथे ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे उत्पादन सुरू होईल. ऑपरेशन सिंदूरमध्ये तुम्ही ब्राह्मोसची ताकद पाहिली असेल, जर तुम्ही ती पाहिली नसेल तर पाकिस्तानी लोकांना विचारा की ब्राह्मोस क्षेपणास्त्राची ताकद काय आहे.'
हेही वाचा - '.....तर मोदी आणि शाहांनी तत्काळ राजीनामा द्यावा' महाविकास आघाडीची मागणी
दहशतवाद हा कुत्र्याच्या शेपटीसारखा आहे -
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुढे म्हटलं की, दहशतवाद हा कुत्र्याच्या शेपटीसारखा आहे. त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायला हवे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र म्हणजे काय? ऑपरेशन सिंदूरमध्ये तुम्ही या क्षेपणास्त्राच्या सामर्थ्याची झलक पाहिली असेल आणि जर तुम्ही ते पाहिले नसेल, तर किमान तुम्ही पाकिस्तानच्या लोकांना विचारले पाहिजे की ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ताकद काय आहे. पंतप्रधानांनी जाहीर केले आहे की दहशतवादाची कोणतीही घटना आता युद्धासारखी असेल. जोपर्यंत आपण दहशतवाद पूर्णपणे नष्ट करत नाही तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही, असंही यावेळी योदी यांनी नमूद केलं.
हेही वाचा - 'पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखा आहे...'; शस्त्रसंधी उल्लंघनानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
दहशतवादाला चिरडून टाकण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी या मोहिमेत सामील व्हावे. दहशतवाद हा कुत्र्याचा शेपूट आहे जो कधीही सरळ होणार नाही. प्रेमाच्या भाषेवर विश्वास न ठेवणाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची तयारी ठेवावी लागेल, असंही यावेळी योगी आदित्यनाथ यांनी म्हटंल आहे.