Mass Transfer of Judges: उत्तर प्रदेशातून मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशातील 582 न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण 582 न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल राजीव भारती यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. 236 अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश, 207 दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग आणि 139 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग यांची बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये उल्लेख केलेले MY-Bharat कॅलेंडर काय आहे? जाणून घ्या
ज्ञानवापी प्रकरणात निकाल देणाऱ्या न्यायाधीशाची देखील बदली -
वाराणसीच्या ज्ञानवापी प्रकरणात निकाल देणारे प्रसिद्ध न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांची देखील बदली करण्यात आली आहे. त्यांची बरेलीहून चित्रकूटला बदली झाली आहे. या बदल्या राज्यातील न्यायिक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि न्यायव्यवस्थेचे कार्यक्षम कामकाज सुनिश्चित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - Indian Express Power List 2025: देशातील 100 सर्वात शक्तिशाली व्यक्तींची यादी जाहीर; कोणी मिळवले टॉप 10 मध्ये स्थान? जाणून घ्या
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या घरात सापडल्या जळालेल्या नोटा -
अलिकडेच दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचे प्रकरण चर्चेत आले होते. त्याच्या घरात आग लागल्यानंतर त्यांच्या घरात जळालेल्या नोटा सापडल्या होत्या. आग लागली तेव्हा ते घरी नव्हते. यावेळी, पोलिस आणि अग्निशमन दलाने आग विझवली. आगीत नोटांचा ढीग जळून राख झाला होता. या प्रकरणी दिल्ली अग्निशमन सेवेच्या प्रमुखांचेही एक विधान समोर आले आहे. न्यायाधीशांच्या घरातील आग विझवताना कोणतीही रोकड सापडली नाही, असे त्यांनी म्हटले होते. तथापि, नंतर न्यायाधीशांच्या घराबाहेर जळालेल्या नोटाही सापडल्या. यानंतर न्यायाधीशांबाबत एक नवीन वाद निर्माण झाला आणि सोशल मीडियावरही लोकांनी न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.