Sunday, August 31, 2025 12:06:02 PM

लग्नाचे वचन मोडणे गुन्हा नाही! तेलंगणा उच्च न्यायालयाचा अजब निर्णय

लग्नाचे वचन मोडणे हा भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा मानला जाणार नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. या निर्णयामुळे सोशल मीडियावर आणि सामान्य लोकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

लग्नाचे वचन मोडणे गुन्हा नाही तेलंगणा उच्च न्यायालयाचा अजब निर्णय
Edited Image

Telangana High Court On Marriage Promise: लग्नाचे वचन मोडणे गुन्हा नाही, असा अजब निर्णय तेलंगणा उच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान दिला आहे. लग्नाचे वचन मोडणे हा भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा मानला जाणार नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. या निर्णयामुळे सोशल मीडियावर आणि सामान्य लोकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण? 

हैदराबादच्या जीवन रेड्डी यांच्या याचिकेवर हा निर्णय आला आहे. 2019 मध्ये पद्मिनी रेड्डी नावाच्या महिलेने त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की जीवन यांनी 2016 मध्ये लग्नाचे आश्वासन देऊन तिच्या पालकांचा विश्वास जिंकला. परंतु, नंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. या तक्रारीवर एलबी नगर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. त्यानंतर जीवन रेड्डी यांनी उच्च न्यायालयात हा FIR रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली.

हेही वाचा - देशातील IIT, IIM, AIIMS आणि NID संस्थांचा UGC च्या डिफॉल्टर यादीत समावेश; काय आहे यामागचं कारण?

न्यायालयाचा युक्तिवाद - 

दरम्यान, उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की वचन देताना आरोपीचा हेतू फसवा होता हे सिद्ध होत नाही तोपर्यंत वचन मोडणे हा गुन्हा नाही. म्हणजेच, जर एखाद्याने फसवणूक करण्याच्या उद्देशाने लग्नाचे वचन दिले आणि त्याचे शारीरिक किंवा मानसिक शोषण, आर्थिक फायदा किंवा प्रतिष्ठेला हानी पोहोचवणे असे भक्कम पुरावे असतील, तरच हा खटला आयपीसीच्या कलम 417 किंवा 420 अंतर्गत गुन्हा मानला जाईल.

हेही वाचा - बिहार ठरले देशातील पहिले ई-व्होटिंग राज्य! नागरिकांनी घरातून मोबाईद्वारे केलं मतदान

उच्च न्यायालयाच्या या अजब निर्णयाची आता सर्वत्र चर्चा होत आहे. हा निकाल भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आणि इतर उच्च न्यायालयांच्या जुन्या निर्णयांशी सुसंगत आहे, परंतु त्याची वेळ आणि संवेदनशीलता लोकांना अस्वस्थ करत आहे. 


सम्बन्धित सामग्री