UP Crime News : बहिणीसोबत मित्राचे प्रेम जुळलं, भावानेच प्रियकराचा काढला काटा; मृतदेह नदीत फेकला
लखनऊ: उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये मित्रानेच आपल्या घनिष्ठ मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येचे कारण केवळ व्यवसायिक मतभेद नव्हते तर एका प्रेमसंबंधातून ही भयानक कटकारस्थान रचले गेले. मृत युवक जुगराज सिंग उर्फ जोगा याचा आपल्या मित्राच्या चुलत बहिणीसोबत प्रेमसंबंध होता. या नात्याला कुटुंबाचा विरोध होता आणि त्याचाच फायदा घेत आरोपींनी मित्राला कायमचे संपवण्याचा निर्णय घेतला.
१६ मार्चला जुगराज सिंग अचानक बेपत्ता झाला. त्याचा फोनही बंद होता. त्यामुळे घरच्यांना अधिक काळजी वाटू लागली. दोन दिवस उलटूनही काहीच खबर न लागल्याने वडिलांनी मोहम्मदपूर खाला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संध्याकाळी लखनऊला जात असल्याचे जुगराजने सांगितले होते. त्याचे आणि मित्रांचे पूर्वी हॉटेल होते. ज्यासाठी त्याने १ लाख रुपये गुंतवले होते. हॉटेल बंद झाल्यानंतर तो ते पैसे घेण्यासाठी लखनऊला गेला होता. पण तो परतलाच नाही. याप्रकरणी तपास सुरू होता. तेव्हा पोलिसांना गोमती नदीच्या मांझी घाटावर एक मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनानंतर त्याची ओळख जुगराज सिंग म्हणून पटली.
हेही वाचा - बसचालकाकडूनच व्योम ग्राफिक्स कंपनीची बस जाळण्याचा प्रयत्न
पोलिसांनी सुरुवातीला अमित यादवला अटक करून चौकशी केली. त्यानंतर आयुष रावत आणि शोभितला ताब्यात घेतल्यावर धक्कादायक माहिती समोर आली. मुख्य सूत्रधार अर्पित यादव याने जुगराजच्या हत्येचा कट रचला होता. अर्पितला आपल्या चुलत बहिणी काजल यादव आणि जुगराजच्या प्रेमसंबंधाचा राग होता. त्याने अनेकदा जुगराजला हे नाते तोडण्यासाठी धमकावले होते. पण जुगराज ऐकला नाही. यामुळे संतापलेल्या अर्पितने आपल्या मित्रांच्या मदतीने त्याला संपवण्याचे ठरवले.
हेही वाचा - सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका
अर्पितने आधी काजलला जबरदस्तीने जुगराजला लखनऊला येण्यासाठी सांगायला लावले. जुगराज तिच्या प्रेमाखातर तिथे पोहोचतला. तेव्हा आरोपींनी त्याला चंद्रिका देवी मंदिराजवळील जंगलात बोलावले. तिथे आधीच घात लावून बसलेल्या अर्पित, रोहन, अमित, आयुष आणि अमन यांनी जुगराजवर अमानुष हल्ला केला. त्याला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. जेव्हा जुगराज अर्धमेला झाला. तेव्हा आरोपींनी त्याला दुचाकीवरून गोमती नदीच्या मांझी घाटावर नेले. तिथे त्यांनी त्याच्या शरीराला टॉवेलमध्ये वीट बांधून नदीत फेकले. यामुळे मृतदेह पाण्यातच राहील आणि तरंगणार नाही आणि सहजपणे कुणाच्या नजरेस पडणार नाही, असा त्यांचा हेतू होता.
घटनास्थळ आणि संशयितांच्या हालचालींचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी अर्पित यादव, आयुष रावत, अमित यादव, रोहन आणि शोभित यांना अटक केली. त्यांच्या घरातून हत्येसाठी वापरलेल्या काठ्या, तसेच दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना न्यायालयात हजर केलं आहे.