Sunday, August 31, 2025 08:38:15 PM

Uttar Pradesh: 35 लाखांची मागणी पूर्ण केली नाही म्हणून विवाहितेची खून; आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना

uttar pradesh 35 लाखांची मागणी पूर्ण केली नाही म्हणून विवाहितेची खून आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना

उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावात एका विवाहितेची हत्या करण्यात आली आहे.  हुंड्यासाठी महिलेचा जीव घेतला आहे.  विवाहितेच्या कुटुंबियांनी सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला असून  ग्रेटर नोएडाच्या कसना पोलिस स्टेशनमधील पोलीस तपास करत आहेत. पीडितेचे लग्न डिसेंबर 2016 मध्ये झाले होते. निक्की असे पीडितेचे नाव होते. 

सासरच्याकडून 35 लाख रुपयांची मागणी 
पीडितेच्या पती आणि सासरच्या लोकांनी सतत 35 लाख रुपयांची मागणी केली. ही मागणी पूर्ण न केल्याने महिलेला प्रथम बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला जाळून टाकण्यात आले.पीडितेच्या कुटुंबीयांच्या माहितीनुसार, निक्की आणि तिची बहीण कांचन दोघींचे एकाच घरात लग्न करुन दिले. कांचनचा विवाह रोहितशी झाला होता तर निक्कीचा विवाह  विपिनशी डिसेंबर 2016 मध्ये झाला होता.

लग्नात स्कॉर्पिओ गाडीसह अनेक गोष्टी देण्यात आल्या. नंतर गाडीही देण्यात आली. तरीही सासरचे लोक सतत 35 लाख रुपयांची मागणी करत होते. मृत महिलेची बहीण कांचन हिने सांगितले की, 21 ऑगस्ट रोजी निक्कीचा पती विपिन आणि कुटुंबातील लोकांनी तिला मारहाण केली आणि तिच्या मानेवर हल्ला केला. ती बेशुद्ध झाल्यानंतर निक्कीवर ज्वलनशील पदार्थ ओतण्यात आला आणि तिला जाळून टाकण्यात आले.

हेही वाचा: Mumbai Shocker: LTT कुशीनगर एक्सप्रेसच्या शौचालयात आढळला 5 वर्षांच्या मुलीचा मृतदेह; हत्येचा संशय

शेजाऱ्यांच्या मदतीने तिला प्रथम जवळच्या रुग्णालयात आणि नंतर दिल्लीला रेफर करण्यात आले. जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत महिलेच्या मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये निष्पाप मुलगी म्हणत आहे की, पप्पांनी मम्मीला लाईटरने जाळून मारले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार
मृत महिलेच्या कुटुंबाचा आरोप आहे की त्यांच्या मुलीच्या लग्नापासून तिच्या सासरच्या घरात तिचा छळ होत होता. पंचायतीमार्फत तोडगा काढण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतु सासरचे लोक सहमत नव्हते. सध्या पीडितेच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून कासना पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पती विपिन, मेहुणा रोहित, सासू दया आणि सासरे सतवीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत आणि लवकरच त्या सर्वांना अटक केली जाईल असे ग्रेटर नोएडाचे एडीसीपी सुधीर कुमार म्हणाले.  


सम्बन्धित सामग्री