Monday, September 01, 2025 08:24:09 AM

Property Rules: सून सासू आणि सासऱ्यांच्या मालमत्तेवर दावा करू शकते का? काय आहे कायदा? जाणून घ्या

भारतात मालमत्तेशी संबंधित वाद खूप काळापासून पाहिले आणि ऐकले जात आहेत. परिणामी, भारतीय संविधानात मालमत्तेबाबत अनेक प्रकारचे कायदे आणि नियम बनवण्यात आले आहेत.

property rules सून सासू आणि सासऱ्यांच्या मालमत्तेवर दावा करू शकते का काय आहे कायदा जाणून घ्या
Property Rules
Edited Image

Property Rules: मालमत्ता ही अशी गोष्ट आहे, ज्यावरून नातेसंबंध देखील तुटतात. मालमत्तेसारख्या संवेदनशील बाबीमुळे सरकारने यासंदर्भात अनेक कायदे केले आहेत. भारतात मालमत्तेशी संबंधित वाद खूप काळापासून पाहिले आणि ऐकले जात आहेत. परिणामी, भारतीय संविधानात मालमत्तेबाबत अनेक प्रकारचे कायदे आणि नियम बनवण्यात आले आहेत. आज आम्ही तुम्हाला एका अशा कायद्याबद्दल सांगणार आहोत जो जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. 

सून तिच्या सासू आणि सासऱ्यांच्या मालकीच्या मालमत्तेवर दावा करू शकते का?

सासू आणि सासऱ्यांच्या मालमत्तेवर कोणाचा अधिकार आहे याबद्दल अनेक प्रकारचे कायदे केले गेले आहेत. सुनेचा तिच्या सासरच्यांच्या मालमत्तेवर अधिकार असतो का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. परंतु, सुनेला तिच्या सासू आणि सासऱ्यांच्या स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेवर कोणताही कायदेशीर अधिकार नाही. सुनेला तिच्या पतीमार्फत तिच्या सासू-सासऱ्यांच्या स्वतःच्या मालमत्तेवर अधिकार मिळतो. जर सासरच्यांना त्यांची स्वतःची मिळवलेली मालमत्ता सुनेला द्यायची असेल तर ते तसे करू शकतात. परंतु, जर सासू आणि सासरे त्यांची स्वतःची मिळवलेली मालमत्ता सुनेला देऊ इच्छित नसतील, तर सून त्या मालमत्तेवर दावा करू शकत नाही. सासू आणि सासरे त्यांची स्वतःची मिळवलेली मालमत्ता कुटुंबातील कोणत्याही सदस्याला मृत्युपत्राद्वारे देऊ शकतात.

हेही वाचा - Hyderabad Bomb Blast Case: हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणी उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! 5 दोषींची फाशीची शिक्षा कायम राहणार

वडिलोपार्जित मालमत्तेवर सुनेचा अधिकार -  

कायद्यानुसार, जर एखाद्या कुटुंबाकडे वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर सून त्या मालमत्तेवर दावा करू शकते. सुनेला वडिलोपार्जित मालमत्तेत फक्त दोन प्रकारे वाटा मिळू शकतो. जर तिचा पती मालमत्तेतील त्याच्या वाट्याचे हक्क तिच्या नावावर करतो तर हे शक्य आहे. याशिवाय, पतीच्या मृत्यूसारख्या परिस्थितीत सून वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करू शकते. 

हेही वाचा - Jaipur Blast Case: जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा

हिंदू अविभाजित कुटुंबाशी संबंधित कायदा

तथापी, कायदा सुनेला हिंदू अविभाजित कुटुंबच्या सदस्याचा दर्जा देतो, परंतु त्यामुळे ती सह-मालकीणी होत नाही. हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार, सह-वारसाधारक म्हणजे अशी व्यक्ती जी केवळ हिंदू अविभाजित कुटुंबात (HUF) जन्म झाल्यामुळे त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर कायदेशीर अधिकार प्राप्त करते. हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 च्या तरतुदींनुसार, HUF मध्ये जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला जन्मापासून सह-भागीदार मानले जाते.
 


सम्बन्धित सामग्री