काही दिवसांपूर्वी भारत विरुद्ध पाकिस्तान असा रंजक सामना पाहायला मिळाला. या लढतीत भारताने पाकवर दणदणीत विजय मिळवला. भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय झालाय.आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील हाय व्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये झाला. पाकिस्तानने पहिली पसंती फलंदाजीला दिली. त्यानंतर पाकिस्तानचा संघ 241 वर ऑल आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियासमोर 242 धावांचे आव्हान होते. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने 3 विकेट, त्याचबरोबर रविंद्र जडेजाने 2 तर अक्षर पटेल आणि हर्षित राणाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
पाकिस्तानकडून बाबर आझम आणि इमाम उल हक सलामीसा फलंदाजीसाठी उतरले होते. या दोन्ही खेळाडूंनी सुरूवातीचे ओव्हर्स खुप चांगली फलंदाजी केली. त्यामुळे टीम इंडियाला विकेटसाठी संघर्ष करावा लागला. परंतु हा संघर्ष मात्र खरा ठरला. भारताने पाकिस्तान संघावर मात केलीय. यामुळे सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळतंय. त्यातच आता पाकिस्तान संघाचा पूर्व कॅप्टन वसीम अक्रम याने भारताविरुद्ध पाकिस्तानच्या कृतीवर टीका केलीय.
हेही वाचा: Mahashivratri 2025: महाशिवरात्रच्या दिवशी बँका बंद?
काय म्हणाला वसीम अक्रम?
पाकिस्तानने शेवटची मोठी ट्रॉफी 2017 मध्ये जिंकली होती, जेव्हा त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी भारताविरुद्ध सर्व वनडे सामने गमावले आहेत. पाकिस्तान संतापला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये रविवारी भारताविरुद्धचा पराभव पुरेसा नव्हता, तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तान क्रिकेट संघ गट फेरीत अजून एक सामना बाकी असतानाच स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. हा पाकिस्तान क्रिकेटसाठी एक नवा तळ आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान संघ अप्रत्याशित कामगिरी करतो आणि हीच त्यांच्या क्रिकेटची ओळख आहे. त्यांनी कधी अतुलनीय यश मिळवले, तर कधी अनाकलनीय अपयशाचा सामना केला. पण गेल्या काही वर्षांत त्यांच्या खेळातील तो अनपेक्षिततेचा गुणधर्मही हरवला आहे. त्यांनी शेवटची मोठी ट्रॉफी 2017 मध्ये जिंकली होती, जेव्हा त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला पराभूत केले होते. त्यानंतर, त्यांनी भारताविरुद्ध सर्व वनडे सामने गमावले आहेत. त्यांच्या अपयशानंतर, वसीम अक्रमने पाकिस्तानवर तीव्र टीका केली. भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांच्या आहारावरसुद्धा त्याने टोमणे मारले.