KC Veerendra Arrested: कर्नाटकातील काँग्रेस आमदार केसी वीरेंद्र यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. या कारवाईत ईडीने आमदारांच्या ठिकाणांवर मोठा छापा टाकत तब्बल 12 कोटी रुपयांची रोकड, 1 कोटी रुपयांचे परकीय चलन आणि कोट्यवधी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
देशभरात 31 ठिकाणी धाडसी छापे
ईडीच्या बेंगळुरू प्रादेशिक कार्यालयाने 22 आणि 23 ऑगस्ट 2025 रोजी गंगटोक, चित्रदुर्ग, बेंगळुरू, हुबळी, जोधपूर, मुंबई आणि गोवा यांसह देशभरातील 31 ठिकाणी छापे टाकले. यामध्ये 5 कॅसिनोंचाही समावेश होता. ही कारवाई काँग्रेस आमदार केसी वीरेंद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाइन व ऑफलाइन बेटिंग प्रकरणाशी संबंधित असल्याचे तपास यंत्रणेने सांगितले आहे. या छाप्यात असे उघड झाले की, आरोपी 'किंग 567' नावाने अनेक ऑनलाइन बेटिंग साइट्स चालवत होते.
हेही वाचा - CBI Raids Anil Ambani House: 17 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ED नंतर आता सीबीआयचा अनिल अंबानींच्या घरावर छापा
बेकायदेशीर व्यवसायाची जाळे उघड
दरम्यान, तपासात असेही समोर आले की आमदारांचा भाऊ केसी थिप्पास्वामी दुबईतून डायमंड सॉफ्टेक, टीआरएस टेक्नॉलॉजीज आणि प्राइम9 टेक्नॉलॉजीज या तीन कंपन्या चालवत होता. या कंपन्या कॉल सेंटर सेवा आणि ऑनलाइन गेमिंग व्यवसायाशी थेट संबंधित आहेत.
12 कोटी रोख, कोट्यवधी रुपयांचे दागिने जप्त
तथापी, शोध मोहिमेदरम्यान सुमारे 12 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे ज्यामध्ये सुमारे 1 कोटी रुपयांचे परकीय चलन, सुमारे 6 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, सुमारे 10 किलो चांदीचे दागिने आणि चार वाहने समाविष्ट आहेत. याशिवाय, 17 बँक खाती आणि 2 बँक लॉकर देखील गोठवण्यात आले आहेत. याशिवाय, के सी वीरेंद्र यांचे भाऊ के सी नागराज आणि त्यांचा मुलगा पृथ्वी एन राज यांच्या घरातून मालमत्तेशी संबंधित अनेक कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली आहेत.
हेही वाचा - Chamoli Cloudburst: चमोलीमध्ये ढगफुटीमुळे मोठे नुकसान; एक महिला ढिगाऱ्याखाली दबली, एक जण बेपत्ता
ईडीचे निवेदन आणि पुढील तपास
ईडीने सांगितले की, केसी वीरेंद्र आणि त्यांचे सहयोगी दुबईहून ऑनलाइन गेमिंग ऑपरेशन्स चालवत होते. तसेच, ते गंगटोकमध्ये जमिनीवर आधारित कॅसिनो भाड्याने घेण्याचा प्रयत्न करत होते. शोधमोहिमेतून समोर आलेल्या पुराव्यांनंतर, 23 ऑगस्ट रोजी वीरेंद्र यांना गंगटोक येथून अटक करण्यात आली. न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांना बंगळुरू न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तथापी, येत्या दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.