बंगळुरु : समाज माध्यमांमध्ये अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत असतात. यामध्ये वेगवेगळे व्हिडीओ आपण अशातच बघत असतो. परंतु कर्नाटक राज्यातील बंगळुरूमधून एक जोडप्याचा व्हिडीओ व्हायर होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तरुणी पेट्रोलच्या टाकीवर बसून तरुणासोबत प्रवासाचा आनंद लुटताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. त्यांचा भररस्त्यातील रोमान्स पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत.
सदर व्हिडीओ एक्स या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. सर्जापूर मुख्य रस्त्यावरील असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये एक जोडपं एकमेकांना घट्ट मिठी मारून प्रवास करत असताना दिसत आहे. तरुण हेल्मेटविना दुचाकी चालवत असून तरुणी तरूणाला घट्ट मिठी मारून पेट्रोलच्या टाकीवर बसून प्रवास करत आहेत. भर रस्त्यात धोकादायक पद्धतीने हे जोडपं प्रवास करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या बेजबाबदारपणामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच इतर वाहनांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा काही जणांनी केली आहे.
हेही वाचा : OMG! तामिळनाडूमध्ये 13 हजार रुपयांना विकले गेले एक लिंबू; काय आहे खास? जाणून घ्या
सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने अश्लील जाळे करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकतो.