Wednesday, August 20, 2025 01:08:44 PM

जम्मूत सीआरपीएफची गाडी 200 फूट दरीत कोसळली; तीन जवानांचा मृत्यू, पाच जण गंभीर

जम्मूमध्ये सीआरपीएफची (CRPF) गाडी 200 फूट दरीत कोसळली आहे. या अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत. उधमपूरच्या बसंतगड भागात हा भीषण अपघात झाला आहे.

जम्मूत सीआरपीएफची गाडी 200 फूट दरीत कोसळली तीन जवानांचा मृत्यू पाच जण गंभीर

 

नवी दिल्ली: जम्मूमध्ये सीआरपीएफची (CRPF) गाडी 200 फूट दरीत कोसळली आहे. या अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत. उधमपूरच्या बसंतगड भागात हा भीषण अपघात झाला आहे.
हेही वाचा: Uttarkashi Cloudburst Update: महाराष्ट्राचे 34 पर्यटक उत्तराखंडमध्ये बेपत्ता?
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड भागात गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता सीआरपीएफ जवानांची एक बंकर गाडी 200 फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात 3 जवानांचा मृत्यू झाला. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 5 जवानांची प्रकृती गंभीर आहे. सीआरपीएफ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सैनिकांच्या एका पथकाला घेऊन जाणारी गाडी रस्त्यावरून घसरली आणि एका उंच उतारावरून खड्ड्यात पडली. घटनास्थळावरुन 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर अनेक जखमी सैनिकांना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री