Wednesday, August 20, 2025 08:39:11 PM

'या' कारणामुळे हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध नाही खेळू शकले

मागच्या पर्वात हार्दिक पंड्याने केलेल्या चुकीमुळे क्रिकेट नियामक मंडळाने त्याला पहिल्या सामन्यासाठी बंदी घातली होती. त्यासोबतच, जसप्रीत बुमराहदेखील गंभीर दुखापतीमुळे अनुपस्थित होता.

या कारणामुळे हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध  नाही खेळू शकले

शनिवारी, 22 मार्च 2025 रोजी आयपीएल 2025 चा सामना सुरु झाला आहे. पहिल्या सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना झाला होता. मात्र, मागच्या पर्वात मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने केलेल्या चुकीमुळे क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्याला पहिल्या सामन्यासाठी बंदी घातली होती. त्यामुळे, रविवारी 23 मार्च 2025 रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मुंबई इंडियन्स सामना झाला होता. यादरम्यान, सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यात कर्णधारपद सांभाळला होता. मात्र, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि गोलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ असलेला जसप्रीत बुमराह या सामन्यात उपस्थित नव्हते. त्यामुळे, अनेकांना हा प्रश्न पडला असेल, नेमकं कोणत्या कारणांमुळे हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह आयपीएल 2025 च्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळताना नाही दिसले. चला तर जाणून घेऊया सविस्तर. 


'या' कारणामुळे हार्दिक पांड्या पहिल्या सामन्यासाठी निलंबित:

आयपीएल 2024 दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या हार्दिक पांड्यावर स्लो ओव्हर रेटसाठी तीन वेळा दंड लादण्यात आला होता. पहिल्या उल्लंघनासाठी 12 लाख रुपये, दुसऱ्यासाठी 24 लाख रुपये, आणि तिसऱ्या उल्लंघनासाठी 30 लाख रुपये दंड आणि एक सामन्याचे निलंबन ठोठावण्यात आले. मुंबई इंडियन्सचा शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध होता, ज्यामध्ये हे तिसरे उल्लंघन झाले. म्हणून, आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळू शकणार नाहीत. 


जसप्रीत बुमराहची प्राकृती चिंताजनक:

गोलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ असलेला जसप्रीत बुमराहची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान, जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती. ज्यामुळे, ते चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधूनही बाहेर राहिले. सध्या, त्यांच्या पुनर्प्राप्तीची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, आयपीएल 2025 च्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराह सहभागी होऊ शकणार नाहीत. 


भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा म्हणाला:


भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा म्हणाले, 'जसप्रीत बुमराहच्या पाठीत दुखापती झाल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर, बुमराहला त्वरित हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. यादरम्यान, बुमराहच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर डॉक्टरांकडून, ''बुमरहाच्या पाठीत उसण भरली आहे. त्यामुळे त्याला लगेच खेळता येणार नाही'', अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे त्याला लगेच खेळता येणार की नाही, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण भारताचे वैद्यकीय पथकदेखील त्याच्या दुखापतीवर नजर ठेवून आहे'. 


सम्बन्धित सामग्री