Thursday, September 18, 2025 02:16:33 PM

Rahul Gandhi On EC: 'निवडणूक आयोग झोपलेला नाही, तो...'; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

या पत्रकार परिषदेत त्यांनी मतदार यादीतील घोटाळ्याबाबत मोठा खुलासा केला. तसेच कर्नाटकमधील अलंडमधील 6,018 मते वगळण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला.

rahul gandhi on ec निवडणूक आयोग झोपलेला नाही तो राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Rahul Gandhi On EC: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 18 सप्टेंबर रोजी दिल्लीतील इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मतदार यादीतील घोटाळ्याबाबत मोठा खुलासा केला. तसेच कर्नाटकमधील अलंडमधील 6,018 मते वगळण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक आयोग झोपलेला नाही, तो जागा आहे आणि पद्धतशीर मदत करत आहे. त्यांनी सांगितले की, 7 ऑगस्ट रोजी त्यांनी विविध राज्यांतील डेटा वापरून मतदान चोरीचा आरोप केला होता. तसेच बिहारमध्ये मतदार हक्क यात्रा काढली. राहुल गांधी म्हणाले, 'माझे काम लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणे आहे. भारतीय लोकशाही सुरक्षित राहावी, हे सुनिश्चित करणे माझे कर्तव्य आहे. मी 100 टक्के पुराव्यांवर आधारितच माहिती सांगतो.' 

सीआयडीच्या पत्रांचा खुलासा 

दरम्यान, राहुल गांधी यांनी आरोप केला की, कर्नाटकमध्ये या प्रकरणाची चौकशी सुरू असून, कर्नाटक सीआयडीने 18 महिन्यांत निवडणूक आयोगाला 18 पत्रे पाठवली आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला माहिती मागितली होती की, अर्ज कोणत्या डिव्हाइसवरून दाखल झाले? कोणत्या IP अॅड्रेसवरून आले? आणि ओटीपी ट्रेल्स काय आहेत. मात्र, आयोगाने अद्याप याबाबत माहिती दिलेली नाही.

हेही वाचा - Avinash Jadhav On Meenatai Thackeray Statue: '24 तासात कारवाई झाली नाही तर...'; अविनाश जाधवांचा इशारा

अलंडमधील 6,018 अर्ज

अलंड मतदारसंघात 6,018 अर्ज स्वयंचलितपणे सॉफ्टवेअर वापरून दाखल केले गेले. या प्रक्रियेत भारताबाहेरील विविध राज्यांतील मोबाइल नंबरचा वापर करून अलंडमधील मत वगळण्याचा प्रयत्न झाला आणि हे मुख्यतः काँग्रेस मतदारांना लक्ष्य करून करण्यात आले, असा गंभीर आरोपही यावेळी राहुल गांधी यांनी केला. 

हेही वाचा - Cloudburst in Uttarakhand's Chamoli : चमोलीत ढगफुटीचा कहर; अनेक जण बेपत्ता, 6 इमारती जमीनदोस्त

मतदान चोरीचा प्रयत्न

तथापी, राहुल गांधी यांनी सांगितले की, कर्नाटकमध्ये बाहेरून मतदान चोरण्याचा प्रयत्न झाला. एका व्यक्तीच्या नंबरवर दोन फॉर्म भरण्यात आले, जे 36 सेकंदात सादर झाले. सॉफ्टवेअर वापरून मतदार यादीतून नावे वगळण्यात आली. या प्रकरणात मुख्य निवडणूक आयुक्तांना 18 पत्रे पाठवण्यात आली होती, परंतु कोणाचे मत वगळले जात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 
 


सम्बन्धित सामग्री