AI Video PM Modi's Mother: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन मोदी यांचे एआय व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी काँग्रेस नेत्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली भाजपच्या निवडणूक सेलचे संयोजक संकेत गुप्ता यांच्या तक्रारीवरून नॉर्थ अव्हेन्यू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, 10 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6:12 वाजता काँग्रेस (आयएनसी बिहार) च्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक्स हँडलवर एआयद्वारे तयार केलेला बनावट व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर आता काँग्रेस आणि बिहार काँग्रेस आयटी सेलशी संबंधित नेत्यांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - PM Modi in Manipur : मणिपूरला 7,300 कोटी रुपयांची मदत; हिंसाचारबाधित कुटुंबांची पंतप्रधानांनी घेतली भेट
तक्रारीत आरोप आहे की, या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे. भाजपचे म्हणणे आहे की हा व्हिडिओ केवळ पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेला कलंकित करण्यासाठी बनवण्यात आला नाही तर महिलांच्या प्रतिष्ठेचा आणि मातृत्वाचा अपमान करणारा आहे. याशिवाय, 27-28 ऑगस्ट 2025 रोजी बिहारमधील दरभंगा येथे आयोजित काँग्रेस-राजद मतदार हक्क यात्रेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईवर अश्लील टिप्पण्या देखील करण्यात आल्या, असा आरोप तक्रारीत आहे.
हेही वाचा - PM Modi In Manipur: 'मणिपूर भारतमातेच्या मुकुटावरील रत्न...'; इंफाळमध्ये पंतप्रधान मोदींचे वक्तव्य
भाजप नेते संकेत गुप्ता यांची तक्रार गंभीर मानून, दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी कलम 318(2), 336(3)(4), 340(2), 352, 356(2) आणि 61(2) अंतर्गत दाखल करण्यात आला असून यात आयटी कायदा आणि डिजिटल डेटा संरक्षण कायद्याचे संबंधित कलमही समाविष्ट आहेत.
दरम्यान, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले आहे की, बिहार काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईचे अशा प्रकारे चित्रण करून कितपत राजकारणात झुकते, हे दाखवले आहे. बुधवारी काँग्रेसने एक्स हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये हिंदीत लिहिले होते, 'साहेबांच्या स्वप्नात आई.' या व्हिडिओमध्ये मोदींच्या आईंना त्यांच्या राजकारणावर टीका करताना दाखवण्यात आले आहे.