Farmer Got Income Tax Notice
Edited Image
Farmer Got Income Tax Notice: सध्या उत्तर प्रदेशच्या आयकर विभागामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. दररोज, कोट्यवधी रुपयांच्या नोटिसा कोणाला ना कोणाला पाठवल्या जात आहेत. आता मथुरा जिल्ह्यातील औरंगाबाद येथील शांती नगर येथील एका शेतकऱ्याला 30 कोटी रुपयांची नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसमुळे या तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबाला धक्का बसला असून शेतकऱ्याची प्रकृती खालावली आहे. या तरुण शेतकऱ्याचे नाव सौरभ कुमार असल्याचे सांगितले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, 26 मार्च रोजी आयकर विभागाने शेतकऱ्याला पोस्टाद्वारे 30 कोटी 38 लाख रुपयांची नोटीस पाठवली आहे. यासोबतच आयकर विभागाने सौरभला आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. आता सौरभचे कुटुंब या सूचनेमुळे खूप चिंतेत आहे. यासंदर्भाती व्हिडिओ सोशल मीडियावर @WeUttarPradesh या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा - RBI 10 आणि 500 रुपयांच्या नोटा जारी करणार! काय असेल खासियत? जाणून घ्या
आयकर विभागाकडून शेतकऱ्याला 30 कोटी रुपयांची नोटीस -
यासंदर्भात बोलताना सौरभ कुमार यांनी म्हटलं आहे की, माझ्याकडे फक्त दोन बिघा जमीन आहे आणि त्यावर माझे कुटुंब उदरनिर्वाह करते. 2022 च्या सुरुवातीला त्याला 14 कोटी रुपयांची नोटीस देण्यात आली होती. या घटनेनंतर सौरभने आयकर कार्यालय गाठले. परंतु तेथे कोणताही उपाय सापडला नाही. त्यानंतर त्याने यासंदर्भात एसपी कार्यालय आणि सदर पोलिस ठाण्यात अर्ज सादर केला आहे. सौरभने सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे.
हेही वाचा - Gold Downfall Prediction: सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! पुढील काही दिवसात सोने 40 हजार रुपयांनी होऊ शकते स्वस्त
दरम्यान, उत्तर प्रदेशातच अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या आठवड्यात, एका कुलूप बनवणाऱ्यालाही आयकर विभागाने कोट्यवधी रुपयांची नोटीस बजावली होती. यासोबतच अलीगडमधील एका ज्यूस विक्रेत्यालाही कोट्यवधी रुपयांची नोटीस देण्यात आली होती. नोटीस मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही धक्का बसला होता.