Mahakumbh Viral Video: महाकुंभात भेटलेल्या शाळेतील एकाच वर्गात शिकणाऱ्या एका मुलाची आणि मुलीची अनेक वर्षांनंतर भेट झाली. विशेष म्हणजे पन्नाशीच्या पुढे पोहोचलेल्या दोघांनी एकमेकांना ओळखले आणि भरभरून गप्पाही मारल्या. शाळेत एकमेकांशी कधीही न बोलणाऱ्या या मुलामुलींना पन्नाशीनंतर.. तेही कुंभमेळ्यात भेट झाल्यानंतर किती गंमत वाटते आहे, हे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेलच.
हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. सर्वच इंटरनेट वापरकर्त्यांना तो खूपच क्यूट वाटत आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ एकदा पाहिल्यानंतर पुन्हा पुन्हा पहावासा वाटेल... आणि तुमच्याही शाळेतील आठवणी ताज्या होतील.. नक्कीच..!
हेही वाचा - 'देशप्रेम तुला काय माहिती? तू नीच आहेस आणि असाच मरशील,' कोहलीवरील ट्विटवर युजर्सची फालतू कमेंट; जावेद अख्तर संतापले
या क्लिपमध्ये, 1988 सालच्या बॅचमध्ये शाळेत शिकणारा एक मुलगा आता अग्निशमन दलातील नोकरीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. तर, त्याला कुंभमेळ्यात भेटलेली त्याची वर्गमैत्रीणही टीचर आहे. तब्बल 37 वर्षांनंतर ते एकमेकांना भेटले आहेत आणि त्यांच्यात खूप मजेदार संभाषण होत आहे. हे संभाषण लोकांनाही खूप आवडले आहे.
'टीचरों की इसी अदा पर तो हम फिदा हैं', 'हर हर गंगे..'
यात टीचर असलेली वर्गमैत्रीण रश्मी अग्निशमन दलातील या वर्गमित्राच्या बोलण्यावर इतकी खळखळून गोड हसत आहे की, तुमचाही मूड फ्रेश होईल. अग्निशमन दलातील संजीव कुमार सिंग यांनी रश्मी यांना विचारलेले प्रश्न मजेशीर आहेतच. शिवाय, शाळेत असताना हे दोघे एकमेकांकडे कशा दृष्टिकोनातून पाहात होते, हे लक्षात येईल. यावरूनच हे दोघेही एकमेकांची फिरकी घेत आहेत.
@SachinGuptaUP ने हा व्हिडिओ X वर पोस्ट केला आणि लिहिले- अग्निशमन अधिकारी संजीव कुमार सिंग यांनी 1988 नंतर प्रयागराज महाकुंभात त्यांची वर्गमैत्रीण रश्मी यांच्याशी भेट घेतली. संपूर्ण चर्चा ऐका. ही बातमी लिहितानापर्यंत या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि 2 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. पोस्टवर पन्नास कमेंट्सही आल्या आहेत.
हेही वाचा - 'लहान मुलांची साक्ष सुद्धा तितकीच...'; पत्नीच्या हत्येसाठी पतीला जन्मठेप सुनावताना सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक विधान