Sunday, August 31, 2025 05:57:44 AM

Parenting Tips : तुमच्या मुलाला स्टेजवर बोलण्याची भीती वाटते? या 5 टिप्समुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल

सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या लोकांशी संभाषण केल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास, विचारशक्ती आणि संवाद कौशल्य चांगले बनते. यासाठी तुम्ही या अगदी सोप्या पद्धतींचा अवलंब करू शकता.

parenting tips  तुमच्या मुलाला स्टेजवर बोलण्याची भीती वाटते या 5 टिप्समुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल

Public speaking and Stage Daring : सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या लोकांसोबत संभाषण केल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास, विचारशक्ती आणि संवाद कौशल्य चांगले बनते. तर चला जाणून घेऊया, की तुम्ही तुमच्या मुलाचे सार्वजनिक संभाषण करण्याची कला कशा प्रकारे चांगली बनवू शकता. यासाठी अतिशय सोप्या पद्धतींचा अवलंब करता येईल.

तुम्हाला तुमच्या मुलाच्या सार्वजनिक ठिकाणी बोलण्याबद्दल काळजी वाटते का? त्याला किंवा तिला लोकांशी बोलताना संकोच वाटतो किंवा स्टेजवर पोहोचताच जे काही बोलयचे ठरवले आहे, ते आठवत नाही, असे घडते का? असे असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता काळजी सोडून द्या आणि मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि सार्वजनिक भाषण चांगले करण्यासाठी या टिप्सची मदत घ्या. चला जाणून घेऊ, हे कशा प्रकारे करता येईल..

हेही वाचा - Parenting Tips : मुलांचे मन एकाग्र होण्यासाठी या खास टिप्स; बुद्धी होईल तीक्ष्ण

घरापासून सुरुवात करा
मुलांमधील स्टेजवर उभे राहून बोलण्याची भीती दूर करण्यापासून ते सार्वजनिक भाषण चांगले करण्यापर्यंत, घरापासून सुरुवात करा. मुलाला कुटुंबातील सदस्यांसमोर लघुकथा, कविता वाचायला सांगा. असे केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना लोकांसमोर बोलण्याचा आत्मविश्वास देखील मिळतो.

सोपे विषय निवडा
सुरुवातीला मुलांना त्यांचे आवडते खेळ, कार्टून, पाळीव प्राणी यासारख्या सोप्या विषयांवर बोलण्यास सांगा. म्हणजे, मुले अशा विषयांवर घाबरून न जाता सहज बोलू शकतात.

सकारात्मक राहा
जेव्हा मूल बोलण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्याच्यात दोष शोधण्याऐवजी त्याला प्रेरित करा. चुकांवर त्याला लगेच व्यत्यय आणण्याऐवजी, प्रेमाने त्या दुरुस्त करा. लक्षात ठेवा, सकारात्मक वातावरणात मूल लवकर शिकते. तसे पाहिले तर, ही गोष्ट लहानपणापासूनच करणे आवश्यक आहे.

शरीराची भाषा देखील महत्त्वाची आहे
मुलांना समजावून सांगा की सार्वजनिक भाषणादरम्यान, केवळ शब्दच नव्हे तर, तुम्ही कसे उभे राहता, डोळ्यांचा संपर्क (Eye Contact) आणि अभिव्यक्ती (Personality) देखील महत्त्वाची आहे. लोकांशी बोलताना या सर्व गोष्टींची विशेष काळजी घ्या.

नियमित सराव महत्त्वाचा आहे
चांगल्या सार्वजनिक भाषणासाठी, मुलाला दररोज 10 मिनिटे उभे राहून किंवा बसून संवादाचा/संभाषणाचा सराव करण्यास सांगा. याशिवाय, त्याला शालेय उपक्रम, वादविवाद आणि स्टेज शोमध्ये सहभागी होण्यास देखील प्रेरित करा. तुम्हाला दिसेल की हळूहळू तुमच्या मुलामध्ये सकारात्मक बदल घडून येत आहेत.

हेही वाचा - Harmful Effects Of Sanitary Pads: महिलांसाठी महत्त्वाची बातमी, सॅनिटरी पॅडमधील केमिकल्समुळे हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो? जाणून घ्या...

(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री