पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यानंतर त्यांचा अमेरिका दौरा यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतंय. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान सर्वांना हादरून ठेवणारी बातमी समोर आली होती. त्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्याचं पाहायला मिळालं होत. दिनांक ११ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये एका अज्ञात व्यक्तीने फोन करत दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असे सांगितले त्यानंतर पोलिसांकडून तात्काळ सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना देत तपास सुरू कऱण्यात आला होता. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा धमकीचा फोन आला होता. त्यानंतर आता मोदींच्या अमेरिका दौऱ्याला यश आल्याचं पाहायला मिळतंय. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा झाल्याचं देखील समोर आलंय.
हेही वाचा: पक्षांतरावर काय म्हणाले खा. संजय दिना पाटील
पंतप्रधान मोदी दौरा विशेष:
पंतप्रधान मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा
मोदी-ट्रम्प द्विपक्षीय बैठकीत विविध विषयांवर चर्चा
व्यापार संबंध, बेकायदेशीर स्थलांतरावर चर्चा झाल्याची माहिती
भारत आणि अमेरिका संबंधांबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची महत्वाची घोषणा
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाला अमेरिका भारताकडे सोपवणार
तहव्वुर राणा 2008 च्या दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार
मोदींच्या अमेरिका दौऱ्याला यश:
मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाला भारताला सोपवण्यात येणार
ट्रम्प यांच्याकडून भारताला F-35 फायटर जेट देण्याची घोषणा
इस्लामिक दहशतवादाविरोधात एकत्रितपणे लढण्याचा निर्णय
आशिया पॅसिफिकसाठी भारताची महत्त्वपूर्ण भूमिका
भारतासह डिफेन्स बिजनेस अधिक वाढवणार
भारताला तेल आणि ऊर्जा सप्लाय करण्यावर सहमती
AI विकसित करण्यासाठी एकत्र मिळून काम करणार
भारतासोबतची व्यापार तूट कमी करण्यास अमेरिकेची सहमती
न्यूक्लियर स्मॉल मॉड्यूलर रिअॅक्टर तयार करण्यासाठी भारत सहकार्य करणार
लॉस एन्जलिस आणि बॉस्टनमध्ये नवे दूतावास सुरू करणार