Wednesday, September 03, 2025 09:09:32 PM

Medicine Price Hike: आजपासून 1 हजार हून अधिक औषधे महागली

आजपासून महाग होणाऱ्या औषधांमध्ये संसर्ग, मधुमेह आणि हृदयरोगावरील औषधांचाही समावेश आहे.

medicine price hike आजपासून 1 हजार हून अधिक औषधे महागली
Medicine Price Hike
Edited Image

Medicine Price Hike: देशातील कोट्यवधी सामान्य लोकांसाठी एक वाईट बातमी आहे. आज, म्हणजेच 1 एप्रिलपासून 900 हून अधिक आवश्यक औषधांच्या किमती 1.74 टक्क्यांनी वाढणार आहेत. यासोबतच सामान्य लोकांचा औषधांचा खर्च वाढेल आणि बचत कमी होईल. आजपासून महाग होणाऱ्या औषधांमध्ये संसर्ग, मधुमेह आणि हृदयरोगावरील औषधांचाही समावेश आहे. केंद्र सरकारच्या रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारा विभाग, राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरण (NPPA) आवश्यक औषधांच्या किंमती निश्चित करते. मागील वर्षाच्या घाऊक किंमत निर्देशांक (WPI) लक्षात घेऊन आवश्यक औषधांच्या किमती कमी किंवा वाढवल्या जातात.

हेही वाचा - उत्तराखंडच्या पुष्कर सिंह धामी सरकारचा राज्यातील 15 ठिकाणांची नवे बदलण्याचा निर्णय

मलेरिया, अँटीव्हायरल, अँटीबायोटिक औषधांच्या किमती वाढणार - 

सरकारच्या या आदेशानंतर, अँटीबायोटिक अ‍ॅझिथ्रोमायसिनची किंमत प्रति टॅब्लेट 11.87 रुपये (250 मिग्रॅ) आणि 23.98 रुपये (500 मिग्रॅ) असेल. तथापि, अमोक्सिसिलिन आणि क्लॅव्हुलेनिक अॅसिडच्या फॉर्म्युलेशनसह अँटीबॅक्टेरियल ड्राय सिरपची किंमत प्रति मिली 2.09 रुपये असेल. 

तथापि, अ‍ॅसायक्लोव्हिर सारख्या अँटीव्हायरलची किंमत प्रति टॅब्लेट 7.74 रुपये  आणि 13.90 रुपये (400 मिग्रॅ) असेल. त्याचप्रमाणे, मलेरियावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची किंमत प्रति टॅब्लेट 6.47 रुपये (200 मिलीग्राम) आणि 14.04 रुपये (400 मिलीग्राम) असेल.

हेही वाचा - आता मुलांना शाळेत देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनात 10 टक्के कमी तेल वापरले जाणार; केंद्र सरकारने 'या' कारणामुळे घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

वेदनाशामक औषधे महागणार -  

दरम्यान, वेदना कमी करणाऱ्या डायक्लोफेनाक या औषधाची कमाल किंमत आता प्रति टॅब्लेट 2.09 रुपये असेल, तर आयबुप्रोफेन टॅब्लेटची किंमत प्रति टॅब्लेट 0.72 रुपये (200 मिग्रॅ) आणि प्रति टॅब्लेट 1.22 रुपये (400 मिग्रॅ) असेल. राष्ट्रीय आवश्यक औषधांच्या यादीत (NLEM) समाविष्ट असलेल्या 1000 हून अधिक औषधांच्या किमती वाढवण्यास NPPA ने मान्यता दिली आहे.
 


सम्बन्धित सामग्री