Wednesday, August 20, 2025 10:11:21 AM

PM Kisan 20th Installment: PM-KISAN हप्ता आज खात्यात! 5 मिनिटांत कसा चेक कराल; जाणून घ्या

पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 2000 रुपये मिळणार असून e-KYC पूर्ण असणे गरजेचे आहे.

pm kisan 20th installment pm-kisan हप्ता आज खात्यात 5 मिनिटांत कसा चेक कराल जाणून घ्या

PM Kisan 20th Installment: देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने आनंदाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच PM-KISAN योजनेअंतर्गत 20 व्या हप्त्याचे वितरण करणार आहेत. या माध्यमातून देशभरातील सुमारे 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2000 रुपये जमा होणार आहेत.

या योजनेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त, एकूण 20,500 कोटी रुपयांचा हप्ता थेट DBT (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला जाणार आहे.

PM-KISAN योजना म्हणजे काय?

सन 2019 मध्ये सुरु झालेली ही योजना अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला वर्षाला 6000 रुपये मिळतात. हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच दर चार महिन्यांनी 2000 रुपयांच्या स्वरूपात खात्यात जमा होतात.

योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत 3 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली आहे. शेतमाल खरेदी, बियाणे, खते, सिंचन यासाठी ही रक्कम उपयोगी पडते.

तुमच्या खात्यात पैसे आलेत का? 5 मिनिटांत अशी चेक करा माहिती

तुमच्या खात्यात 20 वा हप्ता जमा झाला आहे की नाही, हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या- https://pmkisan.gov.in

2. 'किसान कॉर्नर' विभागात जा.

3. 'Beneficiary Status (लाभार्थी स्थिती)' या पर्यायावर क्लिक करा.

4. तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका.

5. दिलेला कॅप्चा (CAPTCHA) कोड भरून 'Get Data' वर क्लिक करा.

6. स्क्रीनवर तुमच्या हप्त्याची माहिती दाखवली जाईल.

e-KYC पूर्ण केल्याशिवाय मिळणार नाही हप्ता

PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. जर तुमची e-KYC पूर्ण नसेल, तर तुमची रक्कम थांबवली जाऊ शकते. e-KYC करण्यासाठी तुम्ही जवळच्या CSC केंद्रावर जाऊन किंवा PM-KISAN पोर्टलवरून स्वतः ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करू शकता.

वाराणसीतून मोदींचा खास कार्यक्रम

यंदा प्रथमच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाराणसी येथून हप्त्याचे वितरण करत आहेत. या कार्यक्रमात केवळ हप्त्याचे वाटप नव्हे तर योजनेच्या पाचव्या वर्षपूर्तीचाही उत्सव साजरा केला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही योजना गेल्या काही वर्षांत खूपच लाभदायक ठरली आहे. सरकारकडून नियमित हप्ते मिळाल्यामुळे शेतीसाठी भांडवल मिळते आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारते. जर तुम्ही PM-KISAN योजनेचे लाभार्थी असाल, तर त्वरित तुमच्या खात्याची स्थिती तपासा. पैसे जमा झाले नसल्यास तुमची e-KYC तपासा आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करा.

तुमचे नाव लाभार्थी यादीत नसेल तर काय कराल?
जर तुमच्याकडे दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेती आहे आणि तुम्ही शेतकरी असाल, तर तुम्ही PM-KISAN योजनेसाठी नोंदणी करू शकता.


सम्बन्धित सामग्री