Sunday, August 31, 2025 11:16:48 AM

पंतप्रधान मोदींनी जारी केला पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी बिहारमधील भागलपूर येथून पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता जारी केला.

पंतप्रधान मोदींनी जारी केला पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी बिहारमधील भागलपूर येथून पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता जारी केला. यावेळी त्यांनी अनेक विकास प्रकल्पांचे देखील उद्घाटन केले. महाकुंभच्या पवित्र काळात मंदारचलच्या भूमीवर पाऊल ठेवणे हे मोठे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी म्हणाले की या भूमीमध्ये आध्यात्म, वारसा आणि विकसित भारताची क्षमता देखील आहे. ही शहीद तिलका मांझी यांची भूमी आहे तसेच रेशीम नगरी म्हणून देखील प्रसिद्ध आहे असे मोदी म्हणाले. बाबा अजगैबीनाथांच्या पवित्र भूमीत  महाशिवरात्रीसाठी जोरदार तयारी देखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अशा पवित्र मुहूर्तावर पीएम किसानचा 19 वा हप्ता जारी करण्यात आला. थेट लाभ हस्तांतरणाद्वारे सुमारे 22 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले.

हेही वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी केली मोठी घोषणा; नमो किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यात होणार वाढ

पंतप्रधानांनी नमूद केले की बिहारमधील सुमारे  75 लाख शेतकरी कुटुंबे पीएम किसान योजनेचे लाभार्थी असून त्यांना 19 वा हप्ता जारी करण्यात आला. आज बिहारच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 1,600 कोटी रुपये थेट जमा झाले असे ते म्हणाले. त्यांनी बिहार आणि देशाच्या इतर भागातील सर्व शेतकरी कुटुंबांचे अभिनंदन केले.

लाल किल्ल्यावरील भाषणामधल्या  वक्तव्याचा  पुनरुच्चार करताना  मोदी म्हणाले, विकसित  भारताचे गरीब, शेतकरी, युवक आणि महिला असे चार प्रमुख स्तंभ आहेत. ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकार असो वा राज्य सरकार, शेतकऱ्यांच्या कल्याणाला आमचे प्राधान्य आहे. गेल्या दशकभरात  शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी  आम्ही संपूर्ण ताकदीनिशी  काम केले, असे मोदी म्हणाले. शेतकऱ्यांना उत्तम  बियाणे, पुरेशी आणि परवडणारी खते, सिंचन सुविधात्यांच्या पशुधनाचे रोगांपासून संरक्षण आणि आपत्तींदरम्यान होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण मिळणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा : PM Kisan: पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता 'या' दिवशी जारी केला जाणार; योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या..

पूर्वी, शेतकरी या समस्यांनी त्रस्त होते. मात्र आपल्या सरकारने ही परिस्थिती बदलली आहे असे सांगत  गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना शेकडो आधुनिक प्रकारची  बियाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत यावर त्यांनी भर दिला. पूर्वी शेतकऱ्यांना युरियासाठी संघर्ष करावा लागत होता आणि काळा बाजार यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते, त्याउलट  आज शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खते मिळतात, असे त्यांनी सांगितले. महामारीच्या मोठ्या संकटातही सरकारने शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासू नये याची काळजी घेतली असे मोदींनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री