Thursday, August 21, 2025 09:20:41 PM

राजनाथ सिंह यांनी घेतली तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत बैठक; सुरक्षा परिस्थिती व संभाव्य धोक्यांबद्दल झाली चर्चा

या बैठकीत सीमेवरील अलीकडील हालचाली आणि ऑपरेशनल तयारीचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर, राजनाथ सिंह डीआरडीओ प्रमुखांना भेटणार आहेत.

राजनाथ सिंह यांनी घेतली तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत बैठक सुरक्षा परिस्थिती व संभाव्य धोक्यांबद्दल झाली चर्चा
Rajnath Singh
Edited Image

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी सीडीएस जनरल अनिल चौहान आणि तिन्ही सेवा प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत देशातील सध्याच्या सुरक्षा परिस्थिती आणि संभाव्य धोक्यांबद्दल सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत सीमेवरील अलीकडील हालचाली आणि ऑपरेशनल तयारीचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर, राजनाथ सिंह डीआरडीओ प्रमुखांना भेटणार असून ते देशात असलेल्या शस्त्रास्त्रांचा, लष्करी उपकरणांची उपलब्धता आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत. 

संरक्षण रणनीतीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. बुधवारी रात्री उत्तर आणि पश्चिम भारतातील 15 ठिकाणी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानी लष्कराचे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले उधळून लावले. तसेच भारताने लाहोरमध्ये पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा दावा केला. 

हेही वाचा - INS विक्रांतने मोडले पाकिस्तानचे कंबरडे! कराचीसह अनेक शहरांमध्ये हल्ले

दरम्यान, 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय लष्कराने बुधवारी पहाटे पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत अनेक पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले. 

हेही वाचा - जम्मूमध्ये ड्रोन हल्ल्यानंतर दिल्लीत हाय अलर्ट! इंडिया गेट करण्यात आले रिकामे, सुरक्षेत वाढ

भारताने नेहमीच संयम आणि जबाबदारी दाखवली असून देश  संवादाद्वारे समस्या सोडवण्यावर विश्वास ठेवतो. तथापि, जर कोणी या प्रतिबंधाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कडक उत्तर मिळेल, असा इशारा राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे.
 


सम्बन्धित सामग्री