Sunday, August 31, 2025 09:09:58 AM

Gas Leak at Pharma Company in Boisar: बोईसरमध्ये फार्मा कंपनीत गॅस गळती; 4 कामगारांचा मृत्यू

अचानक झालेल्या गॅस गळतीमुळे कंपनीत काम करणाऱ्या चार कामगारांचा मृत्यू झाला, तर काही कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर बोईसरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

gas leak at pharma company in boisar बोईसरमध्ये फार्मा कंपनीत गॅस गळती 4 कामगारांचा मृत्यू

Gas Leak at Pharma Company in Boisar: पालघर जिल्ह्यातील बोईसरजवळील तारापूर एमआयडीसीमधील मेलडी फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या औषध कंपनीत मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. अचानक झालेल्या गॅस गळतीमुळे कंपनीत काम करणाऱ्या चार कामगारांचा मृत्यू झाला, तर काही कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर बोईसरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना घडताच परिसरात गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांनी तातडीने बाहेर पळ काढला, मात्र गॅसचा गळतीचा तीव्र परिणाम झाल्याने काही कामगारांना जीव गमवावा लागला. अधिकाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. बाधितांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गॅस गळतीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक तपास सुरू असल्याचे पोलिस आणि एमआयडीसी प्रशासनाने सांगितले आहे.

हेही वाचा - Pune-Solapur Road Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात: वाहनाच्या समोरासमोर धडकेत दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी

गॅस गळतीच्या घटनेनंतर औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक रहिवाशांनी या भागातील उद्योगांमध्ये होणाऱ्या सुरक्षा त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कामगार संघटनांनी देखील औद्योगिक सुरक्षा उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - Nashik Govardhan Grampanchayat Rada : नाशिकच्या गोवर्धन ग्रामपंचायतीत तुफान राडा

याआधीही अशा घटना राज्यात घडल्या आहेत. 21 जुलै 2025 रोजी अंबरनाथ पश्चिमेकडील फॉरेस्ट नाका परिसरात सीएनजी गॅस वाहून नेणाऱ्या ट्रकमधून गॅस गळती झाली होती. या घटनेत जीवितहानी टळली असली तरी लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. तथापी, आज झालेल्या पालघरमधील या अपघातामुळे औद्योगिक सुरक्षेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. या दुर्घटनेचा स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू आहे. 
 


सम्बन्धित सामग्री