Bima Sugam Website Launch: भारताचे विमा नियामक भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) यांनी देशातील पहिले डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPI) म्हणून बिमा सुगम पोर्टल लाँच केले आहे. हे व्यासपीठ जीवन, सामान्य आणि आरोग्य विम्याशी संबंधित सर्व गरजा एका ठिकाणी पूर्ण करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. IRDAI चे अध्यक्ष अजय सेठ यांच्या हस्ते या पोर्टलचे लाँच करण्यात आले. त्यांनी 'बिमा सुगम'ला भारताच्या डिजिटल विमा पायाभूत सुविधेतील एक महत्त्वाचे पाऊल असल्याचं म्हटलं. सरकारचे ध्येय 2047 पर्यंत 'सर्वांसाठी विमा' हे अभियान यशस्वी करणे आहे.
हेही वाचा - PM Vishwakarma Yojana: मोदी सरकारची कारागिरांसाठी मोठी घोषणा! फक्त 5 टक्के व्याजदराने मिळणार 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज
बिमा सुगम पोर्टलची वैशिष्ट्ये
ग्राहकांना विविध कंपन्यांच्या विमा उत्पादनांची तुलना करून योग्य पॉलिसी खरेदी करण्याची सुविधा.
जीवन, आरोग्य आणि सामान्य विमा पॉलिसी ऑनलाईन उपलब्ध.
प्रीमियम तुलना, पॉलिसी खरेदी, नूतनीकरण, क्लेम निपटारा सर्व प्रक्रिया डिजिटल.
पॉलिसी क्रमांक टाकून विमा व्यवस्थापन सोपे.
एक-स्टॉप उपाय : ग्राहक, विमा कंपन्या आणि एजंटसाठी समान व्यासपीठ.
बिमा सुगम पोर्टलचे फायदे -
कागदविरहित व पारदर्शक प्रक्रिया.
वेळखाऊ आणि गुंतागुंतीचे दावे संपुष्टात.
विमा उद्योग आणि ग्राहकांसाठी विश्वासार्ह डिजिटल इंटरफेस.
भविष्यात सर्व विमा कंपन्या व भागीदारांचे एकत्रीकरण होणार.
हेही वाचा - GST Cut : या वस्तू घेणार असाल तर 5 दिवसांनंतरच खरेदी करा.. 22 सप्टेंबरला लागू होणार नवे जीएसटी दर
भविष्यातील दिशा
अधिकाऱ्यांच्या मते, हे व्यासपीठ सुरक्षा, नियामक अनुपालन आणि स्केलेबिलिटी लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. वाढत्या वापरकर्त्यांची संख्या आणि मोठ्या प्रमाणात होणारे व्यवहार हाताळण्यास हे सक्षम असेल. हे प्लॅटफॉर्म देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत विमा पोहोचवेल. तसचे 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्यास हातभार लावेल.