Thursday, September 18, 2025 08:13:10 AM

PM Modi AI Video: 'पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ काढून टाका...'; पाटणा उच्च न्यायालयाचा काँग्रेसला आदेश

काँग्रेसने पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. भाजपने विरोधी पक्षावर पंतप्रधानांच्या आईचा अनादर केल्याचा आरोप केला आहे.

pm modi ai video पंतप्रधान मोदींच्या आईचा ai व्हिडिओ काढून टाका पाटणा उच्च न्यायालयाचा काँग्रेसला आदेश

PM Modi AI Video: पाटणा उच्च न्यायालयाने काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आई हिराबेन मोदी यांचा एआय-जनरेटेड व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसने पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. भाजपने विरोधी पक्षावर पंतप्रधानांच्या आईचा अनादर केल्याचा आरोप केला आहे. तथापी, काँग्रेसने असा दावा केला की व्हिडिओमध्ये कुठेही हिराबेन मोदींचा अनादर केलेला नाही.

हेही वाचा - PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 11 वर्षांत भारत चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

या घटनेवर प्रतिक्रिया देताना जेडीयूचे मुख्य प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले की, पंतप्रधानांच्या आईबद्दल एआय-जनरेटेड व्हिडिओ तयार करणे आणि मातृत्वाच्या महत्त्वाच्या कुटुंब परंपरेवर हल्ला करणे नैतिकदृष्ट्या अपमानास्पद आहे. त्यांनी पुढे सांगितले की, पाटणा उच्च न्यायालयाने व्हिडिओ हटवण्याचे आदेश देऊन कायदेशीर आणि नैतिक न्यायाचा आरसा दाखवला आहे.

हेही वाचा - PM Narendra Modi Birthday : गुजरातचे CM ते भारताचे PM; जाणून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक प्रवास

दरम्यािन, निरज कुमार यांनी काँग्रेसवर टीका करत म्हटलं की, 'राजकीय मत्सरामुळे काँग्रेसची राजकीय दुर्दशा होत आहे. जर संविधान आणि न्यायव्यवस्था अस्तित्वात आहेत, तर कोणत्याही व्यक्तीच्या आई किंवा वडिलांबद्दल अपमानकारक टिप्पण्या करणे कायद्याने गुन्हा आहे.' या प्रकरणामुळे राजकीय वाद आणि सोशल मीडिया नियमांचे पालन यावर देशभरात चर्चा सुरु आहे. 


सम्बन्धित सामग्री