Chinnaswamy Stadium Stampede
Edited Image
बेंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तब्बल 18 वर्षांनंतर आयपीएल जिंकले. या विजयाच्या आनंदात बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयी परेड आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान चेंगराचेंगरीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच या चेंगराचेंगरीत 50 जण जखमी झाले आहेत. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या या सत्कार समारंभात मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते जमले होते. या दरम्यान चेंगराचेंगरीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी जखमी आणि बेशुद्ध लोकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
हेही वाचा - 'मी हे कधीही विसरणार नाही...'; IPL ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहलीने शेअर केली खास पोस्ट
चिन्नास्वामी स्टेडियमवर चेंगराचेंगरी -
चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेट क्रमांक 6 बाहेर ही चेंगराचेंगरी दिसून आली. या चेंगराचेंगरीत 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, चिन्नास्वामी स्टेडियमच्या आत ही चेंगराचेंगरी कशी झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, आरसीबीच्या विजय परेडमध्ये, त्यांच्या आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने आरसीबी चाहते स्टेडियममध्ये पोहोचले.
हेही वाचा - RCB Victory Parade: बंगळुरूमध्ये डीके शिवकुमार यांनी विमानतळावर केलं विराट कोहलीचं भव्य स्वागत, पहा व्हिडिओ
दरम्यान, विजय परेडबाबत बंगळुरू पोलिसांनी एक सल्लागारही जारी केला होता. तरीही, मोठ्या संख्येने लोक तिथे पोहोचले. येथील परिस्थिती इतकी अनियंत्रित झाली की लोक भिंती आणि झाडांवर चढून खेळाडूंची एक झलक पाहण्यास उत्सुक होते. परंतु, चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे आता या वियजी परेडला गालबोट लागल्याचं दिसून येत आहे.