Monday, September 01, 2025 09:49:52 PM

Tahawwur Rana NIA Custody: तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी

मुंबईतील 26/11 बॉम्बस्फोट हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली. आता तहव्वूर राणाची चौकशी देखील होऊ शकते.

tahawwur rana nia custody तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी

नवी दिल्ली : मुंबईतील 26/11 बॉम्बस्फोट हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली. आता तहव्वूर राणाची चौकशी देखील होऊ शकते. एनआयएच्या विशेष न्यायलयानं हा निर्णय दिला आहे. एनआयएनं तहव्वूर राणाच्या 20 दिवसांची कोठडी मागितली होती. अखेर तहव्वूर राणाला 18 दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. पहाटे अडीच वाजताच्या सुमारास तहव्वूर राणाला घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांचा ताफा दाखल झाला. त्यानंतर विशेष एनआयए कोर्ट न्यायाधीश चंदेर जित सिंह यांनी तहव्वुर राणाला 18 दिवसांची कोठडी सुनावली. 

एनआयएकडून कोणते प्रश्न विचारले जाणार? 
तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. आता राष्ट्रीय तपास यंत्रणा राणाला कोणते प्रश्न विचारणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. 26 नोव्हेंबर 2008 ला तहव्वूर राणा कुठे होता?, 8 नोव्हेंबर 2008 ते 21 नोव्हेंबर 2008 दरम्यान भारतात का आला आणि कुठे गेला?, भारतातील वास्तव्यादरम्यान कोणाला आणि कुठे भेटला? 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईत एक मोठा दहशतवादी हल्ला होणार, हे केव्हा कळलं?, तुम्ही डेव्हिड कोलमन हेडलीला किती काळापासून ओळखता?, हेडलीला बनावट व्हिसावर भारतात का पाठवण्यात आलं?, डेव्हिड हेडलीने भारतातील भेट दिलेल्या ठिकाणांबद्दल काय सांगितलं?, डेव्हिड कोलमन हेडली भारतात काय करण्यासाठी आला होता?, भारतात असताना हेडली तुमच्याशी काय बोलला?, मुंबई हल्ल्यात तुमची आणि हेडलीची भूमिका काय होती?, डेव्हिड कोलमनने हेडलीला भारतीय व्हिसा मिळवण्यात कशी मदत केली? यांसारखे प्रश्न तहव्वूर राणाला विचारण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा : Prashant Koratkar Bail : प्रशांत कोरटकरची जेलमधून सुटका

राणाला भारतात आणण्याचा खर्च

26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणा याला अखेर भारतात आणण्यात आले आहे. अमेरिकेतून आरोपीला भारतात आणण्याची कारवाई जितकी संवेदनशील होती तितकीच ती महागडीही होती. तहव्वूर राणाला अमेरिकेतील मियामी येथून भारतात आणण्यासाठी गल्फ स्ट्रीम जी-550 या लक्झरी चार्टर विमानाचा वापर करण्यात आला होता, ज्याचा खर्च प्रति तास सुमारे 9 लाख रुपये आहे. राणाला अमेरिकेतील मियामीमधून भारतात आणण्यासाठी गल्फ स्ट्रीम जी-550 या लक्झरी चार्टर विमानाचा वापर करण्यात आला. गल्फ स्ट्रीम जी-550 विमान एखाद्या आलिशान हॉटेलपेक्षा कमी नाही. 2013 मध्ये बनवलेलं गल्फ स्ट्रीम जी 550, अल्ट्रा लाँग रेंज मिड-साईज श्रेणीमध्ये स्थान आहे. विमानाची कमाल क्षमता 19 प्रवाशांची आहे. तर विमानात 9 बेड कम सीट सुद्धा आहेत. तसेच 6 बेड देखील आहेत. विमानात उड्डाणादरम्यान वायरलेस इंटरनेट, सॅटेलाइट फोन आणि आधुनिक मनोरंजन प्रणाली उपलब्ध आहे. विमानाचा खर्च प्रति तास सुमारे 9 लाख रुपये इतका आहे. 


 


सम्बन्धित सामग्री