ओडिशा : देशात सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. देशातील ओडिशा या राज्यात त्या सापडल्या आहेत. ओडिशा राज्याचे खणन मंत्री बिभूती भूषण जेना यांनी ओडिशा विधानसभेत सोन्याच्या खाणी सापडल्याची माहिती दिली. सरकार लवकरच या खाणींचा लिलाव करणार आहे.
हेही वाचा : नारायण राणेंच्या दाव्यावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण
ओडिशा राज्यात देशातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. ओडिशाच्या सुंदरगड, नबरंगपूर, अंगुल आणि कोरापुटमध्ये या सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. इतकंच नाही तर मलकानगिरी, संबळपूर आणि बौध जिल्ह्यात सरकारने सर्वेक्षण केले होते. त्यातही सोन्याच्या खाणी सापडल्याचे संकेत आहे. केंद्र सरकार लवकरच या खाणींचा लिलाव करणार आहे. ओडिशामध्ये सापडलेल्या या खाणींमुळे देशाची आर्थिक व्यवस्था आणखी चांगली होईल असे सांगण्यात येत आहे. खणन मंत्रालय याबाबत अंतिम अहवाल लवकरच सादर करणार असून या खाणींचा लवकरच लिलाव होणार आहे.