Thursday, September 04, 2025 06:15:51 AM

Theme Parks In India: भारतातील थीम पार्कस तुम्हाला माहित आहे? जाणून घ्या

भारतात फिरण्यासाठी असे अनेक ठिकाण आहेत जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता. अशातच एक दिवस घालवण्यासाठी फॅमिली, फ्रेंड्ससोबत कुठे जायचं जर हा विचार तुम्ही करत असाल तर चला जाणून घेऊया.

theme parks in india भारतातील थीम पार्कस तुम्हाला माहित आहे जाणून घ्या

उन्हाळ्यांत परीक्षा संपल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ती धमाल, मस्ती आणि अ‍ॅडव्हेंचर्स. बऱ्याचदा उन्हाळ्यांत लोक महाबळेश्वरसारख्या थंड ठिकाणी जातात किंवा अ‍ॅडव्हेंचर करण्यासाठी अनेक थीम पार्कना भेट देतात. तर काहीजण आपल्या दैनंदिन कामातून ब्रेक घेऊन पर्यटनसाठी जातात. भारतात फिरण्यासाठी असे अनेक ठिकाण आहेत जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता. अशातच एक दिवस घालवण्यासाठी फॅमिली, फ्रेंड्ससोबत कुठे जायचं जर हा विचार तुम्ही करत असाल तर चला जाणून घेऊया. 


१ - इमॅजिका थीम पार्क:

इमॅजिका थीम पार्क हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये आहे. इथे २० पेक्षा अधिक राइड्स, गेम्स आहेत जसे की रोलरकोस्टर राइड्स मध्ये नाइट्रो, डीप स्पेस, गोल्ड रश पाहायला मिळेल. त्यासोबतच इथे डेयर टू ड्रॉप, मिस्टर इंडिया, अलीबाबा और चालीस चोर, मोशन बॉक्स थिएटर, मैंबो चाय चामा, प्रिंस ऑफ़ थे डार्क वाटर्स आदी. असे अनेक मनोरंजक गोष्टींचे अनुभवदेखील मिळेल. वरूण धवन, आलिया भट्ट यांसारख्या कलाकारांनीदेखील या ठिकाणी भेट देखील दिले आहेत. जगभरातून अनेक पर्यटक इथे अ‍ॅडव्हेंचर करण्यासाठी लाखोंच्या संख्येने येतात. सायंकाळी तुम्हाला इथे विशेष परेडदेखील पाहायला मिळतो. 

२ - वंडरला, बेंगळुरू:

वंडरला हे थीम पार्क असून कर्नाटकातील बेंगळुरू शहरांत आहे. इथे तुम्हाला सर्वाधिक प्रकारच्या राइड्स अनुभवायला मिळेल ज्यामुळे तुमचा उत्साह अजून वाढेल. विशेष म्हणजे हे भारतातील सर्वात मोठे एंटरटेनमेंट थीम पार्क असून तुम्ही इथे पाण्यातील राइड्सदेखील करू शकता. हा पार्क बिदडीजवळ आहे जे बेंगळुरुपासून 27 किमी अंतरावर आहे. हे थीम पार्क तब्बल 82 एकर परीसरात विस्तारलेला आहे. लाखों पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येयेने इथे भेट देतात. 

३ - रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद

रामोजी फिल्म सिटी तेलंगाणामधील हैदराबाद शहरांत आहे. इथे तुम्हाला अनेक प्रकारचे एंटरटेनमेंट राइड्स पाहायला मिळेल. सोबतच या ठिकाणी अनेक बॉलीवूड चित्रपटांचे अनेक शुटिंगदेखील झाले आहेत. दीपिका आणि शाहरुखचा ओम शांती ओम आणि चेन्नई एक्सप्रेस ते अक्षय कुमारचा तीस मार खान आणि अजय देवगणचा गोलमाल सिक्वेलस देखील इथेच शूट झाला आहे. सोबतच इथे फक्त सिनेमांचं शूटिंग एवढंच नाही तर इथे रेंजर राइड, बंपर कार आणि इतर राइड्स देखील अनुभवायला मिळेल. इथे कॉर्पोरेट इव्हेंट, लग्न समारंभ, अ‍ॅडव्हेंचर कॅम्पसाठीदेखील पर्यटक येतात. रामोजी फिल्स सिटी हा जगातला सर्वात मोठा स्टुडिओ असून सूत्रांनुसार रामोजी फिल्म सिटी 2,000 एकरमध्ये पसरले आहे.


सम्बन्धित सामग्री