नवी दिल्ली: भारतात अनेक पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणांना पाहण्यासाठी विविध राज्यातून आणि परदेशातून लाखो पर्यटक भेट देतात. मात्र, भारतात काही अशीही ठिकाणे आहेत जिथे जाण्यासाठी अनेकजण घाबरतात. त्यामुळे, राज्य आणि केंद्र सरकारने याठिकाणी प्रवेश करण्यास मनाई केली आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
रामोजी फिल्मसिटी, हैदराबाद
माहितीनुसार, रामोजी फिल्मसिटीत अनेकांनी पारानॉर्मल ॲक्टिव्हिटी आपल्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत. काहींनी येथील अनेक हॉटेल्समध्ये विचित्र घटना अनुभवल्या आहेत. येथील स्थानिकांच्या मते, रामोजी फिल्मसिटी निजाम सुलतानच्या भूमीवर बांधली गेली आहे. जिथे अनेक प्रकारचे दंडात्मक कारवाया घडत होत्या. याठिकाणी, अनेकांनी विचित्र दृश्ये, बोटांचे ठसे आणि दरवाजे स्वतःच उघडण्याचे आणि बंद होण्याचे आवाज ऐकले आहेत.

हेही वाचा: 'नीट'च्या परीक्षेत अपयश मिळाल्याने विद्यार्थिनीने संपवलं जीवन
अग्रसेन की बाओली, दिल्ली
दिल्लीतील अग्रसेन की बाओली हे ठिकाण त्याच्या सुंदर बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, काहींच्या मते, जर या अग्रसेन की बाओलीमध्ये काळे पाणी भरले की ते आपल्या जवळ असलेल्या लोकांना आकर्षित करते. त्यासोबतच, त्यांना यात उडी मारण्यासाठी संमोहित करते. त्यामुळे, सूर्यास्त झाल्यानंतर आजही लोक याठिकाणी थांबण्यास घाबरतात.

शनिवार वाडा, पुणे
महाराष्ट्रातील प्रसिद्ध शहरांपैकी एक असलेल्या पुण्यात ऐतिहासिक शनिवार वाडा आहे. हा राज्यातील सर्वात मोठा किल्ला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार वाड्याच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि भयंकर घटना घडली होती आणि ते म्हणजे नारायणराव पेशव्यांची हत्या. 1773 मध्ये याच वाड्यात त्यांच्याच नातेवाईकांनी त्यांची हत्या केली होती. नारायणरावांच्या हत्येनंतर, या वाड्यात 'काका मला वाचवा' अशी किंकाळी ऐकू येते. त्यामुळे, सायंकाळी 6 नंतर याठिकाणी थांबण्यास मनाई आहे.

डुमास बीच, गुजरात
गुजरात राज्यातील सुरत येथील डुमास बीच अतिशय सुंदर आहे. मात्र, काही काळानंतर येथे विचित्र घटना घडू लागल्याने पर्यटक याठिकाणी येण्यास घाबरतात. स्थानिकांच्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी या समुद्रकिनाऱ्यावर मृतदेह जाळण्यात आले होते. त्यामुळे आजही अनेक आत्मे येथे भटकत असतात. तसेच, सायंकाळी येथील बीच पर्यटकांना आपल्या दिशेने आकर्षित करते. या कारणामुळे, डुमास बीच भारतातील रहस्यमयी ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखले जाते.
