नवी दिल्ली : भारतावर टॅरिफ लावण्यासाठी ट्रम्प यांनी भारत रशियाकडून खरेदी करत असलेल्या कच्च्या तेलाचं कारण पुढे केलं. ट्रम्प यांनी अनेक धमक्या देत अखेर भारतावर 50 टक्के आयात शुल्क लावलं. यानंतर भारत काय करणार, याकडे सगळ्या जगाच्या नजरा लागल्या होत्या. शिवाय, भारतातील जनतेलाही ट्रम्प यांच्या आक्रस्ताळेपणासमोर भारत कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता लागली होती. देशातील प्रत्येकाच्या मनात भारताने अमेरिकेसमोर झुकू नये, हीच भावना आहे. देशाच्या नेतृत्वाकडूनही देशहिताला प्राधान्य देत असल्याचा आणि कोणासमोर झुकणार नसल्याचा वारंवार पुनरुच्चार करण्यात येत आहे. यातच आता भारताने मोठा निर्णय घेतला आहे.
भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला आहे. अमेरिकेकडून सातत्याने धमकीवजा भाषेत भारतावर दबाव टाकण्याचे काम सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानेच आपण हा टॅरिफ लावल्याचे त्यांनी म्हटले. काहीही करून भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे यासाठी भारतावर दबाव टाकला जात आहे. जगात रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणारा चीन हा देश आहे. मात्र, अमेरिकेने चीनवर टॅरिफ लावण्याची हिंमत केली नाही. अमेरिकेच्या विरोधात अनेक देश पुढे येताना दिसत आहेत. शेवटी या पार्श्वभूमीवर आता भारताने रशियाच्या तेल खरेदीबाबत एक अत्यंत मोठा निर्णय घेतल्याचे बघायला मिळत आहे. भारत काहीही झाले तरीही अमेरिकेपुढे झुकणार नसल्याचे या कृतीतूनही स्पष्ट होत आहे.
हेही वाचा - India GDP Growth Rate: भारताची अर्थव्यवस्था जोमात! पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये 7.8 टक्क्यांनी वाढ
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेकांना असे वाटत होते की, भारत ट्रम्प यांच्या टॅरिफ अस्रासमोर माघार घेईल. अमेरिकेतील अनेक तज्ज्ञही भारताने अमेरिकेला आणि ट्रम्प यांना हलक्यात घेऊ नये, अशा स्वरूपाचे उघड सल्ले देत होते. मात्र, भारताच्या आक्रमक व्यापारी पवित्र्यामुळे ट्रम्प आणि अमेरिकेला जोरदार धक्का बसणार आहे. नुकत्याच मिळालेल्या अहवालानुसार, सप्टेंबर महिन्यात भारत हा रशियाकडून जास्त तेल खरेदी करण्याच्या तयारीत आहे. भारतीय रिफायनरी ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात 10 ते 20 टक्के अधिक रशियाकडून तेल खरेदी करणार आहेत, असे यात म्हटले आहे.
रिपोर्टमध्ये हे सांगण्यात आलंय की, भारत रशियाकडून सप्टेंबर महिन्यात अधिक तेल घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच युक्रेनकडून रशियाच्या 10 रिफायनरींवर हल्ला केला. युक्रेनसोबतच्या सुद्धादरम्यान 2022 मध्ये पश्चिमेकडील देशांनी रशियाच्या तेलावर बहिष्कार टाकला. त्यावेळी भारत हा रशियाच्या बाजूने उभा राहिला आणि मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केले.
त्यावेळीही अमेरिकेने यावर आक्षेप घेतला होता. भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करून त्यावर रिफायनरी करत आहे आणि मोठ्या प्रमाणात पैसे कमावत आहे, असा आरोप सातत्याने अमेरिकेकडून केला जात आहे. हेच नाही तर, भारताला मोठी ऑफर दिल्याच्या आविर्भावात अमेरिकेकडून सांगण्यात आले की, भारताने जर रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले तर त्यांच्यावरील 25 टक्के टॅरिफ आम्ही रद्द करू. आता भारताने लवकरात लवकर रशियन तेलखरेदी बंद करावी, असे अमेरिकेकडून सातत्याने सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - 1st Sepetember New Rules : तयार व्हा ! LPG सिलेंडरपासून SBI च्या कार्डपर्यंत...1 सप्टेंबरपासून होणार आहेत 'हे' मोठे बदल