Trump Imposes 50 percent Tariff On India : डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या (Trump Tariff) अस्त्राने जगभरातील देशांमध्ये दहशत निर्माण केली आहे आणि अजूनही भारत आणि चीनसारख्या देशांशी अमेरिकेचे संबंध बिघडवत आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच भारतावर 25 टक्के टॅरिफ लादला आहे आणि 27 ऑगस्टपासून ते अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादणार आहेत. दरम्यान, एका अमेरिकन अर्थशास्त्रज्ञाने ट्रम्प यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे माजी सल्लागार आणि अव्वल अर्थशास्त्रज्ञ स्टीव्ह हॅन्के यांनी ट्रम्प टॅरिफबद्दल म्हटले आहे की, ही फक्त सुरुवात आहे. त्याचे परिणाम आणखी गंभीर होणार आहेत. एका मुलाखतीत हॅन्के यांनी इशारा दिला की, ट्रम्पची व्यापार धोरणे, भारतापासून त्यांचे अंतर आणि पाकिस्तानशी त्यांचे मैत्रीपूर्ण वर्तन आर्थिक आणि भू-राजकीय संकट निर्माण करू शकते. हॅन्के यांच्या मते ही तर केवळ परिस्थिती बिघडण्याची सुरुवात आहे.
काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली (Nikki Haley Warns Donald Trump) यांनी इशारा दिला की, वॉशिंग्टन आणि नवी दिल्ली यांच्यातील संबंध तुटण्याच्या मार्गावर आहेत. जर चीनच्या वाढत्या प्रभावाच्या काळात वॉशिंग्टनने नवी दिल्लीशी चांगले असलेले संबंध गमावले तर ती एक 'धोरणात्मक आपत्ती' (Strategic disaster) ठरेल. यासोबतच, त्यांनी ट्रम्प प्रशासनाला भारताला शत्रूसारखे वागवू नये, असा इशारा देखील दिला.
म्प सकाळी हस्तांदोलन करू शकतात आणि रात्री त्यांच्याच पाठीत वार करू शकतात
ट्रम्प यांच्याविषयी खुलेपणाने बोलताना हांके म्हणाले की, ट्रम्प हा असा माणूस आहे, जो सकाळी मोदींशी हस्तांदोलन करू शकतो आणि रात्री त्यांच्या पाठीत वार करू शकतो. त्यांनी असे म्हटले की,भारत अमेरिकेच्या मैत्रीवर जास्त काळ अवलंबून राहू शकत नाही. (Trump Shakes Modi’s hand And Stab Him Later, US Economist Slams Donald Trump)
ते पुढे म्हणाले की, 'चीन अधिक प्रभावशाली आहे. जसे आपण म्हणत आलो आहोत की त्यांच्याकडे खाणकाम, धातूशास्त्र आणि भौतिकशास्त्र या स्वरूपात मोठी शस्त्रे आहेत. चीन तिन्हींवर वर्चस्व गाजवतो.' अमेरिकेने सुरुवातीला चीनवर टॅरिफच्या माध्यमातून व्यापार हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चीनच्या भूमिकेसमोर अमेरिकेला एक पाऊल मागे घ्यावे लागले.
हेही वाचा - Nikki Haley Warning : 'भारताला शत्रूसारखे वागवू शकत नाही'; निक्की हेली यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना घरचा आहेर!
ट्रम्प यांचे पाकिस्तान-प्रेम का उतू जात आहे?
हॅन्के म्हणाले की, चीनच्या या वर्चस्वामुळे ट्रम्प यांना पुन्हा युती करण्यास भाग पडले. ते पुढे म्हणाले की, मला वाटते की ट्रम्प भारतापासून दूर जाण्याचे आणि पाकिस्तानकडे वळण्याचे कारण म्हणजे पाकिस्तानला चित्रात आणणे. पण अचानक असे का, ती काही स्थिर अर्थव्यवस्था आहे का? हॅन्के यांच्या मते, याचे कारण भूराजनीती आहे, अर्थव्यवस्था नाही. हॅन्के म्हणाले की, पाकिस्तानचे फील्ड मार्शल मुनीर गेल्या महिन्यात दोनदा अमेरिकेला भेट देऊन आले आहेत. ते इराणवर आणखी एक हल्ला किंवा संभाव्य हल्ल्याची तयारी करत आहेत.
अमेरिका मंदीच्या उंबरठ्यावर
टॅरिफबाबत हॅन्के म्हणाले की, हा अमेरिकन ग्राहकांसाठी एक छुपा कर आहे. हा कर इतर कुठूनही येत नाही, तर अमेरिकेतूनच तो येतो आणि इथून पुढेही येणार आहे. कारण भारतीय उत्पादने टॅरिफमुळे महाग होतील आणि ती खरेदी करणे हा अमेरिकेतील लोकांनाच जास्तीचा त्रास ठरेल. ट्रम्प टॅरिफचे परिणाम अमेरिकन लोकांनाच सहन करावे लागतील. ते म्हणाले की, टॅरिफमुळे वाढत्या किमतींचे परिणाम खूप पुढे जाऊ शकतात. हे दूरगामी दुष्परिणाम ठरू शकतात.
हॅन्के म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत अमेरिकन चलन खूप कमकुवत झाले आहे. त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था डळमळीत होत आहे, असे हॅन्के यांचे म्हणणे आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, अमेरिका मंदीच्या उंबरठ्यावर आहे. ट्रम्प यांची ही धोरणे विनाशाकडे नेत आहेत.
हेही वाचा - Donald Trump : मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा ठरला खोटा, भारतातील मतदानासंदर्भात मोठी माहिती आली समोर
पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांकडून देशाच्या परकीय कर्जाचा स्वतःसाठी वैयक्तिक वापर
हँके यांच्या मते, अमेरिकेच्या पाकिस्तान-प्रेमाचे गुपित अर्थशास्त्रात नाही तर भू-राजकारणात आहे. त्यांनी असा दावा केला की, पाकिस्तानच्या लष्करातील काहींनी देशाच्या परकीय कर्जापैकी 37 टक्के कर्ज ऑफशोअर आश्रयस्थानांमध्ये, बहुतेक दुबईमध्ये वळवले आहे. (म्हणजेच, पाकिस्तानच्या लष्करातील काहींनी देशाच्या परकीय कर्जाचा स्वतःसाठी वैयक्तिक वापर केलाय.) तरीही अमेरिका अजूनही इराणजवळील हवाई तळांवर प्रवेश मिळवण्यासाठी पाकिस्तानकडे मदत मागतो.
“पाकिस्तानचे लष्कर प्रमुख गेल्या महिन्यात दोनदा अमेरिकेत आले आहेत. ते इराणवर आणखी एका हल्ल्यासाठी किंवा संभाव्य हल्ल्यासाठी तयारी करत आहेत”, असेही हँके म्हणाले.
अमेरिकन राजदूतांनी गंभीर आरोप केले होते!
अमेरिकेत टॅरिफ आणि भारताविषयी वेगवेगळी उलट-सुलट मते आहेत. काही काळापूर्वी अमेरिकन राजदूत पीटर नवारो यांनी म्हटले होते की, भारत आम्हाला वस्तू विकून पैसे कमवतो आणि नंतर त्या पैशाने ते रशियन तेल खरेदी करतो, ज्यावर नंतर रिफायनरीमध्ये प्रक्रिया केली जाते आणि ते तेथून भरपूर पैसे कमवतात. याशिवाय, नवारो यांनी भारताला रशियाचे 'वॉशिंग मशीन' आणि टॅरिफचा 'महाराजा' असेही म्हटले होते.