Wednesday, September 03, 2025 02:23:48 PM

'या' सरकारी बँकेने वाढवले कर्जाचे व्याजदर; 3 एप्रिलपासून लागू होणार नवीन दर

या सरकारी बँकेने आरबीआयच्या रेपो दराशी जोडलेल्या किरकोळ कर्जांच्या व्याजदरात 0.10 टक्के वाढ जाहीर केली आहे.

या सरकारी बँकेने वाढवले कर्जाचे व्याजदर 3 एप्रिलपासून लागू होणार नवीन दर
Loan Interest Rate
Edited Image

Indian Bank Interest Rate Hike: कर्ज घेणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेने सोमवारी कर्जाच्या व्याजदरात वाढ जाहीर केली. या सरकारी बँकेने आरबीआयच्या रेपो दराशी जोडलेल्या किरकोळ कर्जांच्या व्याजदरात 0.10 टक्के वाढ जाहीर केली आहे. या वाढीनंतर, इंडियन बँकेकडून घेतलेल्या कर्जावरील व्याजदर 9.05 टक्के होतील. बँकेने सांगितले की वाढलेले व्याजदर 3 एप्रिलपासून लागू होतील.

किरकोळ कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना बसणार फटका - 

इंडियन बँकेच्या या निर्णयाचा थेट परिणाम किरकोळ कर्ज घेणाऱ्या ग्राहकांवर होईल. इंडियन बँकेने सोमवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, बँकेच्या मालमत्ता दायित्व व्यवस्थापन समितीने (ALCO) मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (MCLR), ट्रेझरी बिल बेस्ड लेंडिंग रेट (TBLR), बेस रेट, बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (BPLR) आणि रेपो बेस्ड लेंडिंग रेट (RBLR) यांचा आढावा घेतला आहे. बँकेने TBLR, बेस रेट, BPLR आणि RBLR मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेपो आधारित बेंचमार्क कर्ज दर (RBLR) सध्याच्या 8.95 टक्क्यांवरून 9.05 टक्क्यांपर्यंत वाढेल.

हेही वाचा - Zomato Job Cut: झोमॅटोने 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं; काय आहे यामागील कारण? जाणून घ्या

रेपो दरात कपात - 

गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दर 6.5 टक्क्यांवरून 6.25 टक्के केला होता. आरबीआयने रेपो दरात कपात केली असली तरी, इंडियन बँकेने कर्जाचे व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, 6 महिने ते 3 वर्षांच्या मुदतपूर्ती कालावधीसाठी ट्रेझरी बिल आधारित व्याजदर 0.05 टक्क्यांनी कमी करून 6.5 टक्के करण्यात आला आहे. 

हेही वाचा - महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवर कारने प्रवास करणाऱ्यांसाठी वाईट बातमी! आजपासून टोलसाठी जास्त पैसे मोजावे लागणार

इंडियन बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण - 

दरम्यान, आज इंडियन बँकेच्या शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून येत आहे. मंगळवारी दुपारी 12.09 वाजता, इंडियन बँकेचे शेअर्स बीएसई वर 1.62% घसरून 533.45 रुपयांवर व्यवहार करत होते. इंडियन बँकेच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 626.35 रुपये आहे तर 52 आठवड्यांचा नीचांक 474.05 रुपये आहे. 
 


सम्बन्धित सामग्री