Wednesday, September 03, 2025 02:50:09 PM

How Sweet! लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी Sachin आणि Anjali Tendulkar चा 'तो' क्षण कॅमेऱ्यात कैद!

सचिन-अंजली तेंडुलकर हे कपल तरुण वयापासून ते आता पन्नाशी उलटल्यानंतरही त्यांच्या चाहत्यांसाठी क्यूट कपल आहे. आताही त्यांचा लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेले असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

how sweet लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी sachin आणि anjali tendulkar चा तो क्षण कॅमेऱ्यात कैद

Sachin Tendulkar Anjali Tendulkar Viral Video: गणेश चतुर्थीच्या उत्सवात देशभरातील घरे आणि रस्ते रोषणाईने सजले असताना, सेलिब्रिटी देखील या भव्य उत्सवात सहभागी होत आहेत. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर अलीकडेच सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला होता. यावेळी सचिनसह त्याची पत्नी अंजली, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन हे उपस्थित होते. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सचिनच्या कुटुंबीयांसोबत अर्जुनशी साखरपुडा झाल्याची चर्चा असलेली सानिया चंडोकही सोबत असेल, असे चाहत्यांना वाटते होते. मात्र, त्यांच्यासोबत सानिया कुठे दिसली नाही.

सध्या सगळीकडेच गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळात लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे. तर क्रिकेटपटूंच्या घरीदेखील गणपती बाप्पांचे आगमन झाल्याचे फोटो, व्हीडिओ शेअर केले आहेत. सचिन तेंडुलकर पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलं सारा-अर्जुनसह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले होते. यादरम्यान सचिन तेंडुलकर आणि पत्नी अंजली तेंडुलकर यांचा खूपच गोड व्हीडिओ आता व्हायरल होत आहे. प्रेम असावं तर असं, नुसतं प्रेम अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा - Sara TendulKar च्या या फोटोमागील सत्य काय आहे? या मुलासोबत ती गोव्याला जात असल्याच्या अफवा

अंजलीची ओढणी रस्त्यावर पाण्यात होती.. सचिनने पटकन..
अंजली पुढे चालत होत्या. त्यांच्या पाठीमागे सचिन चालत होता. रस्त्यावर पावसामुळे थोडेसे पाणी साठले होते. अंजली यांची ओढणी एका बाजूला रस्त्यावर जाऊन टेकत होती. मात्र, ते अंजली यांच्या लक्षात आले नव्हते. पाठीमागे चालणाऱ्या सचिनने पटकन पुढे होत खाली वाकून ती ओढणी सावरली आणि ती खराब होऊ दिली नाही आणि तिच्या खांद्यावर ठेवली. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  चाहत्यांना सचिनचे खूप कौतुक वाटत आहे. पन्नाशी ओलांडलेल्या या कपलमधले प्रेम आणि सचिन यांनी लक्ष ठेवून पत्नीसाठी केलेली ही कृती चाहत्यांना मनाला स्पर्श करून जात आहे.

सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सचिन व अंजली यांच्या लग्नाला आता 30 वर्षे उलटून गेली आहेत. सचिन व अंजलीची लव्हस्टोरी सर्वांनाच माहित आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकमेकांना पहिल्यांदा भेटले होते आणि इथून पुढे त्यांची लव्हस्टोरी रंगत गेली. त्यांचं एकमेकांवरील प्रेम, अंजलीचं कुटुंबासाठी समर्पण आणि एकमेकांना दिलेली साथ यामुळे त्यांचं नातं कायमच भक्कम राहिलं आहे.

दरम्यान, सचिन यांचा मुलगा अर्जुन याचा सानिया चंडोकशी साखरपुडा झाल्याची बातमी 13 ऑगस्टला समोर आली होती. पण याबाबत दोन्ही कुटुंबानी अधिकृत माहिती दिलेली नाही.

हेही वाचा - Ganpati Bappa च्या मूर्तीसमोर श्वानाने पुढचे पंजे उंचावत केला डान्स; Viral Video पाहून लोक म्हणाले..


सम्बन्धित सामग्री