Thursday, August 21, 2025 02:26:00 AM

कशी नशिबानं थट्टा आज मांडली! शिकार आणि शिकारी एकाच विहीरीत; रानडुकराचा काळ आला होता, पण..

रानडुकरावर झडप घालायला निघालेला वाघ आणि जीव मुठीत घेऊन पळणारे रानडुक्कर असे दोघेही एका विहिरीत पडले. मग पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा..

कशी नशिबानं थट्टा आज मांडली शिकार आणि शिकारी एकाच विहीरीत रानडुकराचा काळ आला होता पण

सिओनी : प्राणी-पक्ष्यांचे निरीक्षण हा अनेकांचा छंद असतो. मात्र, एखाद्या वन्य प्राण्याचं, पक्ष्याचं दर्शन तसं दुर्मीळच असतं. त्यातही प्राणीही दिसला आणि फोटो-व्हिडिओ काढण्याची संधी मिळाली तर, कपिलाषष्ठीचा योगच!  मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात चित्रित केलेला असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.

त्याचं झालं असं की, रानडुकरावर झडप घालायला निघालेला वाघ आणि जीव मुठीत घेऊन पळणारे रानडुक्कर असे दोघेही एका विहिरीत पडले. मग पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा..

प्राण्यांचे बरेच फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.

हेही वाचा - Viral Video : टक्कल केल्यावरही किती सुंदर दिसतेय नवरी! धाडसी निर्णय घेत विग घालण्याचं टाळलं; तब्बल 4 कोटी व्ह्यूज

रानडुकराचा काळ आला होता.. पण विहिरीने वाचवलं
वाघ आणि रानडुक्कर एकाच विहिरीत पडले. एका क्षणापूर्वी एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले हे दोघे आपला जीव वाचवण्यासाठी विहीरीतून बाहेर पडण्याची वाट पाहत एकमेकांच्या आजूबाजूला पोहू लागले. अचानकपणे भलत्याच संकटात पडल्यामुळे वाघ भूक आणि शिकार दोन्ही विसरून गेला. या दोघांनाही वन विभागाने सुखरूपपणे वाचवले आहे.

या वाघाला आणि रानडुक्कराला पाहण्यासाठी विहिरीभोवती गावकऱ्यांनी गर्दी केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. शिकार करण्यासाठी वाघ रानडुक्कराचा पाठलाग करत होता. परंतु, चुकून दोघंही खोल विहिरीत पडले. दरम्यान, गावकऱ्यांनी वन्यजीव बचाव पथकांना घटनास्थळी बोलावले. त्यानंतर दोन्ही प्राण्यांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

हेही वाचा - राहुल द्रविडची रिक्षाचालकाशी भररस्त्यात वादावादी; कारला रिक्षाची धडक लागल्याने नाराज, VIDEO व्हायरल

@PenchMP नावाच्या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला २ हजारांच्या वर लाईक्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.  एकानं म्हंटलंय, वेळ कधीही बदलते, तर आणि एकानं “कोणत्याच गोष्टीचा जास्त गर्व करू नये कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पैसा, सौंदर्य, ताकद या सगळ्यांला मर्यादा ही असतेच”


सम्बन्धित सामग्री