Sunday, August 31, 2025 01:20:55 PM

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत 10 राज्यांतील पर्यटक अडकले; आतापर्यंत 409 जणांची सुटका

उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण 409 लोकांना वाचवण्यात आले आहे. यामध्ये गंगोत्री, हर्षिल आणि परिसरातील पर्यटकांचा समावेश आहे.

uttarkashi cloudburst उत्तरकाशीत 10 राज्यांतील पर्यटक अडकले आतापर्यंत 409 जणांची सुटका
Edited Image

Uttarkashi Cloudburst Update: उत्तरकाशी जिल्ह्यातील ढगफुटीच्या आपत्तीनंतर मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बचावकार्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण 409 लोकांना वाचवण्यात आले आहे. यामध्ये गंगोत्री, हर्षिल आणि परिसरातील पर्यटकांचा समावेश आहे. आपत्ती व्यवस्थापन सचिवांनी सांगितले की, गंगोत्री आणि परिसरातून 274 लोकांना हर्षिल येथे सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे. या सर्व पर्यटकांसाठी हर्षिलमध्ये निवास, अन्न आणि वैद्यकीय सेवांची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत 135 लोकांना वाचवण्यात आले आहे आणि सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. 100 लोकांना उत्तरकाशी आणि 35 लोकांना डेहराडून येथे पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा - Uttarkashi Cloudburst Update: महाराष्ट्राचे 34 पर्यटक उत्तराखंडमध्ये बेपत्ता?

उत्तरकाशीत अडकले या राज्यांतील पर्यटक - 

आपत्ती व्यवस्थापनाने सांगितले की, गंगोत्री आणि आसपासच्या भागातून आतापर्यंत 274 लोकांना हर्षिल येथे आणण्यात आले आहे. सर्व लोक पूर्णपणे सुरक्षित आहेत. यामध्ये गुजरातमधील 131, महाराष्ट्रातील 123, मध्य प्रदेशातील 21, उत्तर प्रदेशातील 12, राजस्थानातील 6, दिल्लीतील 7, आसाममधील 5, कर्नाटकातील 5, तेलंगणातील 3 आणि पंजाबमधील एका पर्यटकांचा समावेश आहे.

हेही वाचा - मंचरमधील 24 नागरिक उत्तराखंडमध्ये अडकले; सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्री धामी यांना मदतीचे आवाहन

बचाव कार्य जोरात सुरू - 

दरम्यान, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभाग, एनडीआरएफ, आयटीबीपी, भारतीय लष्कर, आणि स्थानिक प्रशासन यांचे एकत्रित पथक बचाव कार्यात गुंतले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रात्री उशिरा बचाव कार्याचा आढावा घेतला. उत्तरकाशीच्या धारलीमध्ये बचाव कार्यासाठी भारतीय लष्कराने 24 ते 48 तास बचाव कार्य चालवण्याची योजना आखली आहे. जॉली ग्रँटमध्ये चिनूक आणि एमआय-17 हेलिकॉप्टर तैनात आहेत. अभियंते, डॉक्टर आणि बचाव तज्ञांसह 225 हून अधिक सैनिक जमिनीवर तैनात करण्यात आले आहेत. टेकला येथे एक रीको रडार टीम तैनात करण्यात आली आहे. 
 


सम्बन्धित सामग्री