Wednesday, August 20, 2025 10:38:01 AM

अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लागू; टॅरिफचा शेतकऱ्यांना मोठा फटका

भारत आणि अमेरिका व्यापार करारासाठी बराच काळ चर्चा करत होते. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्ट 2025 पासून भारतातील सर्व निर्यातीवर 25 टक्के कर लागू करण्याची घोषणा केली आहे.

अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लागू टॅरिफचा शेतकऱ्यांना मोठा फटका

मुंबई: भारत आणि अमेरिका व्यापार करारासाठी बराच काळ चर्चा करत होते. मात्र अखेर हा करार तुटला आहे. याच मुख्य कारण भारताने अमेरिकेच्या दुग्धजन्य पदार्थ आणि कृषी क्षेत्रासंबंधीच्या मागणीला नकार दिला. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्ट 2025 पासून भारतातील सर्व निर्यातीवर 25 टक्के कर लागू करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय वेगळा दंड देखील आकारला जाणार आहे. हा करार का होऊ शकला नाही आणि त्याचा भारतावर काय परिणाम होईल? हे जाणून घेऊयात...

अमेरिकेच्या भारतावरील नाराजीचे कारण काय?

"भारत अमेरिकन वस्तूंवर (80 टक्क्यांपर्यंत) जड शुल्क लावतो. तर अमेरिका भारतातील वस्तूंवर फक्त 0 टक्के ते 3 टक्के कर लावतो. ट्रम्प हे असंतुलन स्वीकारत नाहीत. म्हणूनच ट्रम्प यांनी परस्पर शुल्क धोरण स्वीकारले आहे. म्हणजेच भारत त्यांच्या वस्तूंवर जितका कर लावेल तितकाच कर अमेरिका भारतीय वस्तूंवर लावेल" असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: Monthly Horoscope August 2025: लक्ष्मी नारायण राजयोगामुळे वृषभ, कर्क राशींसह 5 राशींचे लोक श्रीमंत होतील

दुग्धजन्य पदार्थांवर मोठे मतभेद 

अमेरिकेला त्यांच्या दुग्धजन्य कंपन्यांना भारतात प्रवेश मिळावा अशी इच्छा होती. मात्र भारताने नकार दिला. कारण अमेरिकेचे दूध मासांहारी होते. अमेरिकेत गायींना जो चारा दिला जातो. त्यात मासे, डुक्कर, कोंबडी, अगदी कुत्रे आणि मांजरींचे अवशेष असतात. भारतात गायीला आईचा स्थान दिलं जातं. म्हणून असे दूध भारतीय संस्कृती आणि श्रद्धेच्या विरुद्ध मानले जाते. म्हणूनच भारताने दुग्धजन्य कराराला परवानगी दिली नाही. 

सोयाबीन आणि कॉर्नच्या आयातीवरुन वाद 

ट्रम्प यांना वाटते की भारताने अमेरिकेतून अनुवांशिकरित्या सुधारित(GM) सोयाबीन आणि कॉर्न खरेदी करण्याची परवानगी द्यावी. तसेच अमेरिकेत केल्याप्रमाणे भारताने अमेरिकेतून येणाऱ्या इतर कृषी उत्पादनांवरील कर काढून टाकावा किंवा कमी करावा अशी त्यांची इच्छा आहे. परंतु भारताचा याला विरोध आहे. कारण यामुळे भारतातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. जर परदेशातून स्वस्त दरात धान्य येऊ लागले. तर भारतातील शेतकऱ्यांना त्यांची पिके पिकण्यास अडचणी येऊ शकतात आणि पैसे कमी मिळू शकतात. भारत सरकार अमेरिकेतून GM सोयाबीन आणि कॉर्न खरेदी करण्यास तयार नाही. कारण सध्या भारतात कापूस वगळता कोणतेही GM पिक घेण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्यांना खाण्याची किंवा ऑर्डर करण्याची परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच भारतात सोयाबीन आणि मका पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आधीच चांगला भाव मिळत नाही. त्यात सरकारने परदेशातून वस्तू आयात केल्या तर आपल्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसेल आणि त्यांचे नुकसान होईल. 

देशांतर्गत शेतकऱ्यांच्या रक्षण करण्यास प्राधान्य 

भारताने अमेरिकन सफरचंद, सुकामेवा, बदाम आणि अक्रोड इत्यादींवरील शुल्क कमी करावे अशी ट्रम्प यांची इच्छा होती. मात्र भारताने म्हटले की यामुळे देशातील शेतकऱ्यांचे नुकसान होईल. उदा. अमेरिकेचे वॉशिंग्टन सफरचंद 200 रु प्रति किलो आणि काश्मीरचे सफरचंद 25 रु प्रति किलो दराने उपलब्ध असतील. तर लोक स्वस्त परदेशी सफरचंद खरेदी करतील. त्यामुळे काश्मिरी शेतकऱ्यांचे नुकसान होईल. भारताने शेतकऱ्यांच्या रोजगाराचे आणि उपजीविकेचे रक्षण करण्यास प्राधान्य दिले आहे. 

हेही वाचा: मुंडेंच्या कार्यकाळात खत घोटाळा; मुंडेंच्या मंत्रिमंडळात पुन्हा येण्याच्या चर्चांवरुन धसांचा आरोप

अमेरिकेने कर लादल्याने भारतावर परिणाम

2023-2024 या आर्थिक वर्षात भारताने अमेरिकेला 4.5 लाख कोटी रुपयांच्या वस्तू निर्यात केल्या. तर अमेरिकेने भारताला 3.49 लाख कोटी रुपयांच्या वस्तू विकल्या. म्हणजेच अमेरिकेची भारतासोबत सुमारे 71 हजार कोटी रुपयांची व्यापार तूट आहे. आता अमेरिका भारतीय वस्तूंवर 25 टक्के कर लादेल तेव्हा भारतीय उत्पादने महाग होतील. यामुळे अमेरिकेत त्यांची मागणी कमी होईल, त्यामुळे निर्यातीवर परिणाम होऊन निर्यात कमी होईल आणि भारतीय व्यापारी, शेतकरी, कामगार यांचे नुकसान होईल. 

25 टक्के शुल्काचा थेट परिणाम कसा होईल?
जर अमेरिकेत भारतीय उत्पादन 100 रुपयांना विकले गेले तर 25 टक्के शुल्कानंतर त्याची किंमत 125 रुपये होईल. आणि त्याव्यतिरिक्त जर दंडही लावला तर किंमत आणखी वाढेल. जर किंमत वाढली तर मागणी कमी होईल, जर मागणी कमी झाली तर निर्यात कमी होईल आणि जर निर्यात कमी झाली तर भारतीय व्यापारी, शेतकरी आणि कामगारांच्या उत्पन्नावर परिणाम होईल.


सम्बन्धित सामग्री