Monday, September 01, 2025 04:40:42 AM

Snake Bites : किंग कोबरापेक्षा खतरनाक सापाचा तरुणाला दंश; दिली 32 अ‌ॅन्टी व्हेनम इंजक्शन, कुटुंबियांनी पाहिल्यावर..

आपल्या खोलीत बेडवर झोपलेल्या एका तरुणाला कॉमन क्रेटा जातीच्या सापानं चावा घेतला. साप चावल्याचं समजताच नातेवाईकांनी त्या तरुणाला रुग्णालयात दाखलं केलं. तिथं त्याला विषरोधक 32 इंजेक्शन देण्यात आली...

snake bites  किंग कोबरापेक्षा खतरनाक सापाचा तरुणाला दंश दिली 32 अ‌ॅन्टी व्हेनम इंजक्शन कुटुंबियांनी पाहिल्यावर

 

नवी दिल्ली : घरात आपल्या खोलीत बेडवर झोपलेल्या एका तरुणाला कॉमन क्रेटा जातीच्या सापानं चावा घेतला. साप चावल्याचं समजताच नातेवाईकांनी त्या तरुणाला रुग्णालयात दाखलं केलं. तिथं त्याला विषरोधक 32 इंजेक्शन देण्यात आली, त्यामुळे त्याचा जीव वाचला. यामुळे कुटुंबानं सुटकेचा निश्वास सोडला, पण..

 

हलदौर, बिजनोर मालपुरा गावातील विजयपाल सिंह यांचा 27 वर्षीय मुलगा लोकेश हा शुक्रवारी सकाळी खोलीत झोपलेला असताना कॉमन क्रेटा जातीच्या सापानं चावा घेतला. चावल्यानंतर साप लपून बसला, पण लोकेशला तो दिसला. परिस्थिती पाहता नातेवाईकांनी त्याला लगेच जिल्हा रुग्णालयात नेले. तिथून लोकेशला प्राथमिक उपचारानंतर दुसऱ्या दवाखान्यात रेफर करण्यात आले. नातेवाईकांनी शेवटी लोकेशला एका खाजगी रुग्णालयात नेले. तिथे त्याला ३२ विषरोधक इंजेक्शन देण्यात आली.

 

या परिसरात साप चावल्यावर बरेच लोक लोकांना भूतबाधा घालवणाऱ्या लोकांकडे घेऊन जातात. जर नातेवाईकांनी लोकेशला तशा एखाद्याकडे नेले असते तर त्याच्या जीवाला धोका असता. या प्रकरणात, सर्पमित्र भरत भास्कर यांनी सांगितले की, कॉमन क्रेट साप नागापेक्षा जास्त धोकादायक आहे.

 

त्याच्या विषात न्यूरोटॉक्सिन असतात, ते मज्जासंस्थेवर परिणाम करते. वेळेवर उपचार न केल्यास स्नायू कमकुवत होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यामुळे मृत्यू होऊ शकतो. जर एखाद्याला साप चावला तर घाबरू नये, पण ताबडतोब डॉक्टरकडे उपचारासाठी जावे.

 

साप चावल्यावर...

 

डॉक्टरांच्या मते, साप चावल्यानं न्यूरोटॉक्सिक आणि व्हॅस्क्युलोटॉक्सिक लक्षणे दिसून येतात. न्यूरोटॉक्सिकमध्ये रुग्णाच्या मेंदूवर परिणाम होतो. त्याचे रक्त परिसंचरण थांबते. यामुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. व्हॅस्क्युलोटॉक्सिकच्या बाबतीत संपूर्ण शरीराचे रक्त परिसंचरण थांबते. शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य भागात रक्तस्त्राव सुरू होतो. यामुळे मृत्यू होतो.


सम्बन्धित सामग्री