नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशभरात ‘इंडियाज गॉट लेटेंट’ मधील आक्षेपार्ह विधानांमुळे रणवीर अलाहबादीया हे नाव देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. रणवीरच्या विरोधात विविध ठिकाणी तक्रारी दाखल होत आहेत. तसेच, त्याचे लाखो फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स कमी झाले आहेत. रणवीरला लोकांच्या रोषासोबतच कायदेशीर अडचणींचाही सामना करावा लागत आहे. या कायदेशीर अडचणींतून बाहेर पडण्यासाठी रणवीरने अभिनव चंद्रचूड यांना स्वतःचे वकीलपत्र दिले आहे. त्यामुळे आता रणवीरच्या बाजूने अभिनव चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयात लढत आहेत.
दरम्यान, यूट्यूबवर आपल्या स्टाईलने लोकप्रियता मिळवणारा रणवीर अलाहाबादिया अशा संकटात सापडला आहे, ज्यातून त्याला कोणतीही सुटका होताना दिसत नाही.
'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोमध्ये त्याने स्पर्धकाला इतक्या निंदनीय भाषेत केलेलं वक्तव्य त्याला चांगलंच महागात पडत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि महिला आयोगापर्यंत सर्वांचाच राग अनावर झाला. हे प्रकरण इतके विकोपाला गेले की, त्याच्याविरुद्ध अनेक पोलिस ठाण्यात तक्रारी आणि एफआयआर दाखल करण्यात आले. आता परिस्थिती अशी बनली आहे की त्याला त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या खटल्यांसाठी वेगवेगळ्या राज्यांमधील न्यायालयांमध्ये धाव घ्यावी लागेल. हे टाळण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यांनी अभिनव चंद्रचूड यांना वकील म्हणून नियुक्त केले. मात्र, यानंतरही सर्वोच्च न्यायालयाकडून रणवीर अलाहाबादियाला दिलासा मिळू शकला नाही. हे प्रकरण सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या खंडपीठापर्यंत पोहोचले. पण त्यांनी लगेच ऐकण्यास नकार दिला आहे. सीजेआय खन्ना यांच्या खंडपीठाने सांगितले की, पुढील दोन-तीन दिवसांत हे प्रकरण सूचीबद्ध केले जाईल.
हेही वाचा - ‘असा प्रसंग 40 वर्षांत कधीच पाहिला नाही.. रेल्वेची एक सूचना.. अन् झाली तुफान चेंगराचेंगरी’, हमालाने सांगितली आपबीती
कोण आहेत हे अभिनव चंद्रचूड? चला जाणून घेऊ..
Who Is Abhinav Chandrachud: अभिनव चंद्रचूड हे एक कुशल वकील आणि लेखक देखील आहेत. त्यांनी स्टॅनफोर्ड लॉ स्कूलमधून डॉक्टर ऑफ द सायन्स ऑफ लॉ आणि मास्टर ऑफ द सायन्स ऑफ लॉ पदवी प्राप्त केली आहे. सध्या त्यांचं नाव रणवीर अलाहबादीयामुळे चर्चेत आले आहे. हे नाव आहे अभिनव चंद्रचूड. अभिनव चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयात रणवीर अलाहबादीयाच्या बाजूने लढत आहेत. ते माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. अभिनव यांचे आजोबा म्हणजेच माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे वडील वाय. व्ही. चंद्रचूड हेही भारताचे सरन्यायाधीश होते.
भारताच्या न्यायिक वर्तुळात अभिनव चंद्रचूड यांच्या कुटुंबाचे नाव खूप मोठे आहे. त्यांच्या वडिलांना मे 2016 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर ते भारताचे सरन्यायाधीश झाले. न्यायव्यवस्थेत स्वतःच्या वडिलांचे मोठे पद असूनही, अभिनव यांनी त्यांच्या वडिलांच्या कार्यकाळात कधीही सर्वोच्च न्यायालयात खटला लढवला नव्हता.
गेल्या वर्षी त्यांच्या निरोप समारंभाच्या भाषणात, माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी त्यांच्या दोन्ही मुलांबद्दल, अभिनव आणि चिंतन यांच्याबद्दल एक किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते की, 'मी एकदा दोघांनाही सर्वोच्च न्यायालयातही खटला चालवत जा, असे सांगितले होते. कारण, मला त्यांना जास्तीत जास्त भेटण्याची संधी मिळाली असती. पण, व्यावसायिक कारणांमुळे दोघांनीही ही ऑफर नाकारली होती.'
हेही वाचा - Mahakumbh 2025: महाकुंभानंतर नागा, अघोरी साधू परतू लागलेत, आता ते कुठे जाणार? जाणून घ्या..
1982 ते 1985 दरम्यान, हार्वर्डमध्ये शिक्षण घेत असताना माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी कोणत्याही भारतीय न्यायालयात हजर राहण्याचे टाळले होते. कारण त्यावेळी त्यांचे वडील, वाय. व्ही. चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश होते, अशी आठवण चंद्रचूड यांनी मागे एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती.
कोण आहेत अभिनव चंद्रचूड?
अभिनव चंद्रचूड हे एक कुशल वकील आणि लेखक देखील आहेत. त्यांनी स्टॅनफोर्ड लॉ स्कूलमधून डॉक्टर ऑफ द सायन्स ऑफ लॉ आणि मास्टर ऑफ द सायन्स ऑफ लॉ पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांनी 2008 मध्ये मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. नंतर त्यांनी हार्वर्ड लॉ स्कूलमधून कायद्यात पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांनी गिब्सन, डन अँड क्रचर या आंतरराष्ट्रीय लॉ फर्ममध्ये सहाय्यक वकील म्हणूनही काम केले आहे. याचबरोबर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, ज्यात रिपब्लिक ऑफ रेटोरिक : फ्री स्पीच अँड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया (2017) आणि सुप्रीम व्हिस्पर्स: कॉन्व्हर्सेशन्स विथ जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया 1980-1989 (2018) यांचा समावेश आहे.