दिल्ली: 10 एप्रिल राजी महावीर जयंती असून या दिवशी तुमच्या शहरातील बँका बंद राहतील का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. प्रत्येक राज्यात विशिष्ट सण आणि प्रादेशिक सुट्ट्यांवर अवलंबून बँक सुट्ट्या बदलतात. अशा परिस्थितीत, बँकिंगशी संबंधित काम करण्यासाठी, तुमच्या शहरातील बँक कधी बंद असते आणि कधी बंद नसते हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, महावीर जयंती गुरुवार, 10 एप्रिल 2025 रोजी साजरी केली जाईल. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
महावीर जयंती निमित्त 'या' राज्यांमध्ये बँका बंद राहणार -
महावीर जयंती हा जैन समुदायाचा एक प्रमुख सण आहे, जो भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. 10 एप्रिल रोजी गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणा यासह अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. याशिवाय, ओडिशा, तामिळनाडू (काही भाग वगळता), चंदीगड, बिहार, त्रिपुरा, जम्मू आणि काश्मीर, गोवा, केरळ आणि सिक्कीम यासारख्या राज्यांमध्ये बँका कार्यरत असतील.
हेही वाचा - RBI Repo Rate Cut: रेपो रेटमध्ये मोठी कपात! तुम्हाला फायदा होणार की तोटा ? जाणून घ्या
एप्रिल 2025 मधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी -
- 10 एप्रिल 2025, गुरुवार, - महावीर जयंतीमुळे अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
- 12 एप्रिल 2025, शनिवार - दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.
- 13 एप्रिल 2025, रविवार - साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
- 14 एप्रिल 2025, सोमवार - डॉ. भीमराव आंबेडकर जयंती / प्रादेशिक नववर्षामुळे अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
- 15 एप्रिल 2025, मंगळवार - बंगाली नववर्ष / हिमाचल दिन / बोहाग बिहू मुळे पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, आसामसह काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
- 16 एप्रिल 2025, बुधवार - बोहाग बिहू (दुसरा दिवस) मुळे गुवाहाटी (आसाम) मध्ये बँका बंद राहतील.
- 18 एप्रिल 2025, शुक्रवार - गुड फ्रायडेमुळे बहुतेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
- 20 एप्रिल 2025, रविवार - साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
- 21 एप्रिल 2025, सोमवार - गरिया पूजेमुळे मिझोरममध्ये बँका बंद राहतील.
- 26 एप्रिल 2025, शनिवार - चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.
- 27 एप्रिल 2025, रविवार - साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
- 29 एप्रिल 2025, मंगळवार - भगवान परशुराम जयंतीनिमित्त हिमाचल प्रदेशात बँका बंद राहतील.
- 30 एप्रिल 2025, बुधवार - बसव जयंती / अक्षय्य तृतीयेमुळे कर्नाटकात बँका बंद राहतील.
हेही वाचा - लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट
तथापि, बँक सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात, म्हणून कृपया तुमच्या क्षेत्रातील बँक शाखेशी खात्री करा. बँका बंद असताना अनेक ऑनलाइन उपलब्ध असतात.