Gold-Silver Rates Today: गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत असताना, अखेर देशात सोने आणि चांदीच्या किमतीत थोडी घसरण दिसून आली आहे. अमेरिकेतील फेडरल रिझर्व 17 सप्टेंबर रोजी आपले धोरण जाहीर करणार असल्यामुळे, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, त्यापूर्वी सोन्याच्या दरातील तेजी थांबू शकते. काल, 14 सप्टेंबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,11,170 होता, तर आज तो 1,09,350 पर्यंत घसरला आहे. त्याचप्रमाणे, 1 किलो चांदीची किंमत 1,28,120 झाली आहे. सोन्याच्या दरात मोठी घट झाली नसली तरी, खरेदीदारांसाठी ही काहीशी दिलासा देणारी बाब आहे.
दरम्यान, तज्ञांच्या मते सणासुदीच्या हंगामात पुन्हा दर वाढू शकतात. पुढील आठवड्यात नवरात्र सुरू होणार आहे, त्यानंतर दिवाळी, धनतेरस आणि लग्नाचा हंगाम सुरू होईल. या काळात सोन्याची मागणी पारंपरिकपणे जास्त असते, ज्यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - ITR Filing Last Date: आज आयकर रिटर्न भरण्याचा शेवटचा दिवस; उद्यापासून लागणार 'इतका' दंड
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर स्थिर असून, प्रति औंस अंदाजे 3,600 डॉलर जवळ आहेत. बाजाराचे लक्ष 17 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या फेड रिझर्वच्या बैठकीवर आहे, जिथे व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याच्या मागणीत वृद्धी होत असल्याचेही दिसून येत आहे.
हेही वाचा - Property Tax : भेट म्हणून मिळालेल्या घरावर कर भरावा लागणार, पण नेमका नियम काय आहे?
आजचे सोन्याचे दर
24 कॅरेट: 1,09,350 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: 1,00,238 रुपये प्रति 10 ग्रॅम
18 कॅरेट: 82,013 रुपये प्रति 10 ग्रॅम
आजचे चांदीचे दर
1 किलो: 1,28,120 रुपये
100 ग्रॅम: 12,812 रुपये
काही प्रमुख शहरांतील दर
चेन्नई: 24 कॅरेट 1,09,700 रुपये, 22 कॅरेट 1,00,558 रुपये
बेंगळुरू: 24 कॅरेट 1,09,470 रुपये, 22 कॅरेट 1,00,348 रुपये
हैदराबाद: 24 कॅरेट 1,09,470 रुपये, 22 कॅरेट 1,00,348 रुपये
मुंबई: 24 कॅरेट 1,09,380 रुपये, 22 कॅरेट 1,00,265 रुपये
तथापी, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सणासुदीच्या हंगामात सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा वाढू शकतात. त्यामुळे खरेदीदारांनी सोने-चांदी खरेदी करण्यासाठी योग्यवेळी निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.
(Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!)