Wednesday, September 10, 2025 04:31:53 AM

IPhone 17 Series Launch Event : नव्या नवेली नंदा आणि अरमान मलिक यांनी घेतली अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांची भेट

आयफोन 17 लॉंच होण्यापूर्वी सुप्रसिद्ध अभिनेते अमिनाभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा आणि गायक अरमान मलिक यांनी अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांची भेट घेतली.

iphone 17 series launch event  नव्या नवेली नंदा आणि अरमान मलिक यांनी घेतली अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांची भेट

मुंबई: आयफोन 17 लॉंच होण्यापूर्वी सुप्रसिद्ध अभिनेते अमिनाभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा आणि गायक अरमान मलिक यांनी अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांची भेट घेतली. यादरम्यान, नव्या नवेली नंदा आणि गायक अरमान मलिक यांनी अ‍ॅपल पार्कला भेट दिल्याचे फोटो आणि व्हिडिओही शेअर केले. नव्या नवेली नंदा आणि अरमान मलिक यांनी अचानक अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांची भेट घेतल्याने सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 

नव्या नवेली नंदाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत 'Day 1 with @apple #ShotOnIphone' असे कॅप्शन दिले. नव्याच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या कार्यक्रमात ॲपल त्यांच्या एआय वैशिष्ट्यांसह नवीन आयफोन्स लॉंच करणार, अशी अपेक्षा आहे.

कोण आहे नव्या नवेली नंदा?

नव्या नवेली नंदा सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात आहे. तसेच, नव्या नवेली नंदा श्वेता बच्चन आणि उद्योजक निखिल नंदा यांची मुलगी आहे. नव्याचा जन्म 6 डिसेंबर 1997 रोजी झाला. नव्याने तिचे शालेय शिक्षण सेव्हनॉक्स स्कूलमधून पूर्ण केले. तिने न्यू यॉर्कमधील फोर्डहॅम विद्यापीठातून डिजिटल तंत्रज्ञान आणि युएक्स डिझाईनमध्ये बॅचलरची पदवी मिळवली. नव्याने 'व्हॉट द हेल नव्या' नावाच्या एक पॉडकास्ट होस्ट केला, ज्यात स्त्रीवाद आणि समाजातील महिलांच्या भूमिकेशी संबंधित विषयांवर चर्चा केली गेली. नव्या सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी आहे. 

हेही वाचा: Vice President Election Result: उपराष्ट्रपतीपदी सीपी राधाकृष्णन यांची निवड; 452 मतांनी मिळवला विजय

कोण आहे अरमान मलिक?

अरमान मलिक हा प्रसिद्ध गायक आहे. अरमानने विविध भाषांमध्ये गायन केले आहेत. अरमानचा जन्म 22 जुलै 1995 रोजी मुंबईत झाला. अरमानचे वडील डब्बू मलिक एक प्रसिद्ध संगीतकार आहेत. अरमानने जमनाबाई नरसी स्कूल आणि उषा प्रवीण गांधी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमधून शिक्षण पूर्ण केले.

2006 मध्ये अरमान मलिकने 'सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स' या संगीताच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गायन क्षेत्रात पदार्पण केले. 2011 मध्ये अरमान मलिकने 'कच्चा लिंबू' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर, अरमान मलिकने विविध चित्रपटांत गायन केले. 


सम्बन्धित सामग्री