Wednesday, September 10, 2025 02:39:18 AM

Nepal Gen-Z Revolution: पंतप्रधानांनंतर आता नेपाळच्या राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा; आंदोलकांकडून राष्ट्रपती भवनात जाळपोळ

सतत बिकट होत असलेल्या परिस्थितीचा विचार करून राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त येत आहे.

nepal gen-z revolution पंतप्रधानांनंतर आता नेपाळच्या राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा आंदोलकांकडून राष्ट्रपती भवनात जाळपोळ

Nepal Gen-Z Revolution: नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेली हिंसक निदर्शने दिवसेंदिवस गंभीर बनत आहेत. सोमवारी झालेल्या निदर्शनांमध्ये 20 जणांचा मृत्यू झाला. तसेच 100 हून अधिक जखमी झाले. सोशल मीडियावरील बंदीविरोधात जनरल झेड तरुणांनी केलेल्या निदर्शनामुळे ओली सरकार गंभीर संकटात आले. यामुळे पंतप्रधान केपी शर्मा ओलीसह गृह मंत्री रमेश लेखक, कृषीमंत्री रामनाथ अधिकारी, आरोग्यमंत्री आणि अन्य पाच मंत्र्यांनी राजीनामा दिला. सतत बिकट होत असलेल्या परिस्थितीचा विचार करून राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त येत आहे.

हेही वाचा Rabi Laxmi Burnt Alive : माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू; संतप्त आंदोलकांनी लावली होती घराला आग

राजीनाम्यानंतरही आंदोलकांचा राग थांबलेला नाही. मंगळवारी नेपाळच्या संसद भवनापासून ते पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या निवासस्थानापर्यंत आंदोलकांनी दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ केली. तसेच राष्ट्रपती भवनाला निदर्शकांनी आग लावली, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. राजीनाम्यानंतर देशातील अनेक मंत्री आणि विरोधी पक्षातील 20 हून अधिक खासदारांनीही सामूहिकपणे राजीनामा दिल्याचे समजते. विरोधी पक्ष आता संसद विसर्जित करून पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी करत आहे. 

हेही वाचा - Nepal Gen- Z Protest: वातावरण चिघळलं! पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या निवासस्थानी जाळपोळ; आंदोलकांनी नाचगाणी करत साजरा केला आनंद

भारतीय नागरिकांसाठी सूचना जारी 

भारत सरकारने परिस्थिती गंभीर असल्याने आपल्या नागरिकांसाठी सूचना जारी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) मंगळवारी सांगितले की, परिस्थिती सामान्य होईपर्यंत नेपाळमध्ये प्रवास टाळावा. भारतीय नागरिकांनी सध्या निवासस्थानी राहावे, रस्त्यावर न जाण्याचे आवाहन केले आहे आणि पूर्ण खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे राष्ट्रव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्यामुळे देशात राजकीय अस्थिरता वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
 


सम्बन्धित सामग्री