Wednesday, September 10, 2025 01:26:54 AM

Vice President Election Result: उपराष्ट्रपतीपदी सीपी राधाकृष्णन यांची निवड; 452 मतांनी मिळवला विजय

मंगळवारी झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत सीपी राधाकृष्णन 452 मते मिळवून भारताचे नवे उपराष्ट्रपती बनले. त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना पराभूत केले.

vice president election result उपराष्ट्रपतीपदी सीपी राधाकृष्णन यांची निवड 452 मतांनी मिळवला विजय

Vice President Election Result: मंगळवारी पार पडलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन यांची ऐतिहासिक विजय मिळवत भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्यांनी विरोधी INDIA आघाडीचे उमेदवार आणि माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. निवडणुकीत एनडीए उमेदवार राधाकृष्णन यांना 452 पहिल्या पसंतीची मते मिळाली, तर विरोधी आघाडीचे उमेदवार रेड्डी यांना 300 मते मिळाली. 

निकाल जाहीर करताना राज्यसभेचे सरचिटणीस पी.सी. मोदी म्हणाले, 'सीपी राधाकृष्णन यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे.' मतदानाची प्रक्रिया मंगळवारी सकाळी 10 वाजता सुरू झाली आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालली. मतदान करणाऱ्या सदस्यांमध्ये पंतप्रधान मोदी हे पहिले होते. निवडणुकीच्या निकालानंतर एनडीए आघाडीत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा - Siachen Avalanche: लडाखमध्ये सियाचीन बेस कॅम्पवर हिमस्खलन; 3 जवानांचा मृत्यू

सीपी राधाकृष्णन कोण आहेत?

20 ऑक्टोबर 1957 रोजी तामिळनाडूतील तिरुप्पूर येथे जन्मलेले सीपी राधाकृष्णन हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असून, चार दशकांहून अधिक काळाचा समृद्ध राजकीय अनुभव त्यांच्याकडे आहे. सध्या ते महाराष्ट्राचे 24 वे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी झारखंडचे राज्यपालपद भूषवले आहे. तसेच त्यांनी तेलंगणा आणि पुद्दुचेरीचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता.

हेही वाचा - Air India Flights Canceled : नेपाळमध्ये Gen Z चा निषेध तीव्र; एअर इंडियाची दिल्ली-काठमांडू उड्डाणे रद्द

राधाकृष्णन हे संघटन कौशल्य, साधेपणा आणि कठोर प्रशासनशैलीसाठी ओळखले जातात. उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर ते राज्यसभेचे सभापती म्हणून काम पाहतील. त्यांच्या निवडीमुळे दक्षिण भारतातून उपराष्ट्रपतीपदी आलेल्या नेत्यांची परंपरा पुढे सुरू राहिली आहे. राधाकृष्णन यांच्या निवडीने एनडीए आघाडीला मोठा राजकीय दिलासा मिळाला असून, पुढील संसदीय कार्यकाळात त्यांच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष लागले आहे.  


सम्बन्धित सामग्री