Thursday, August 21, 2025 12:05:21 AM

22 Crore Scam : छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलात 22 कोटींचा घोटाळा

संकुलाच्या कत्राटी कर्मचाऱ्यांनीच मारला 22 कोटींवर डल्ला. खोटी कागदपत्रे जोडून सरकारी रक्कम स्वत:च्या खात्यात केली वळती.आरोपींनी बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या गाड्या आणि परदेशवारी केल्ल्याची माहिती.

22 crore scam  छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलात 22 कोटींचा घोटाळा

छत्रपती संभाजीनगर: विभागीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैंक खात्यातील 21 कोटी 59 लाख 38 हजार 287 रुपये दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या खात्यांत वळते करून डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या पैशांमध्ये आरोपींनी महागड्या गाड्या खरेदी करून परदेश वरी केल्याची देखील माहिती आहे. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीनंतर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय . पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, एक आरोपी फरार आहे. 

क्रीडा संकुलासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी जमा होण्यासाठी क्रीडा संकुलाच्या नावाने इंडियन बँकेमध्ये खाते उघडण्यात आले होते, या खात्यातील व्यवहार क्रीडा उपसंचालकांच्या सहीने धनादेशाद्वारे होतो. मात्र विभागीय संकुलातील कंत्राटी कर्मचारी असलेले आरोपी हर्षकुमार क्षीरसागर, यशोदा शेट्टी आणि तिचा नवरा बीके जीवन यांनी बनावट कागदपत्रे तयार करून बँकेला दिली आणि स्वतःचा नंबर इंटरनेट बँकिंग साठी ऍक्टिव्हेट करून त्यावरून ही रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवली. विशेष म्हणजे विभागीय उपसंचालकाच्या 6 महिन्यानंतर हा प्रकार लक्षात आला.
 
कसा केला घोटाळा? 

क्षीरसागरने हा घोटाळा करण्यासाठी उपसंचालकांच्या नाव आणि स्वाक्षरीचा वापर करून बँकेस बनावट मजकुराचे पत्र पाठवून खात्याला स्वतःचा मोबाइल क्रमांक जोडला. मोबाईल नंबर जोडल्यानंतर नेट बैंकिंग सुविधा सुरू करून घेत पैसे ट्रान्स्फर केले. आतापर्यंत क्षीरसागर, शेट्टी यांच्या खात्यात आले 59 कोटी. फेसबुक मध्ये नोंदी, पावती बुक लिहिणे, बँकेची पत्रव्यवहार करणे असे काम क्षीरसागर आणि शेट्टी करत होते.  2023 पासून त्यांच्या खात्यात जवळपास 59 कोटी सात लाख 82 हजार रुपयांचा निधी आला. त्यामधून कोट्यावधी रुपये त्यांनी वळती केले 

कंत्राटी कर्मचारी इतकी मोठी रक्कम स्वतःच्या खात्यात ट्रान्स्फर करीत असताना क्रीडा उपसंचालक, बँकेतील अधिकारी अनभिज्ञ कसे राहिले, असा प्रश्न आहे. आयकर विभागाच्या नोटिसाही आल्या नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. तर आरोपींनी याच पैशांमधून परदेश वाऱ्या करून बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या गाड्या खरेदी केल्याची माहिती क्रीडा संकुलणातील सूत्रांनी दिली. मात्र, यावर पोलीस अजून तरी बोलण्यास तयार नाही तपासात सर्व समोरील असा पोलिसांचा दावा आहे. 


सम्बन्धित सामग्री