Monday, September 01, 2025 11:06:15 AM

महाराष्ट्रात दुपारी ३ पर्यंत ४५.५३ टक्के मतदान

महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान सुरू आहे. मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी होईल.

महाराष्ट्रात दुपारी ३ पर्यंत ४५५३ टक्के मतदान

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान सुरू आहे. मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी होईल. राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान झाले. आतापर्यंत राज्यात सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात आणि सर्वात कमी मतदान मुंबई शहर जिल्ह्यात झाले आहे. 

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय मतदानाची दुपारी तीन वाजेपर्यंतची टक्केवारी 

मुंबई ३९.३४ टक्के
मुंबई उपनगर ४०.८९ टक्के
ठाणे ३८.९४ टक्के
कोल्हापूर ५४.०६ टक्के
संभाजीनगर  ४७.०५ टक्के
नांदेड ४२.८७ टक्के
परभणी ४८.८४ टक्के
बीड ४६.१५ टक्के
लातूर ४८.३४ टक्के
हिंगोली ४९.४६ टक्के
गडचिरोली ६२.९९ टक्के
बारामती ४३.७८ टक्के
वाशिम ४३.६७ टक्के
गोंदिया ५३.८८ टक्के
नाशिक ४६.८६ टक्के
नंदुरबार ५१.१६ टक्के
धुळे ४७.६२ टक्के
जळगाव ४०.६२ टक्के
अहमदनगर ४७.८२ टक्के
नागपूर ४४.४५ टक्के
अमरावती ४५.१३ टक्के
चंद्रपूर ४९.८७ टक्के
वर्धा ४९.६८ टक्के
बुलढाणा ४७.४८ टक्के
यवतमाळ ४८.८१ टक्के
भंडारा ५१.३२ टक्के
पालघर ४६.८२ टक्के
रायगड ४८.१३ टक्के
रत्नागिरी ५०.०४ टक्के
सिंधुदुर्ग ५१.०५ टक्के
सांगली ४८.३९ टक्के
सातारा ४९.८२ टक्के
सोलापूर ४३.४२ टक्के
पुणे ४१.७० टक्के


सम्बन्धित सामग्री