Wednesday, September 03, 2025 09:35:59 PM

पंतप्रधानांकडून महाराष्ट्राला कौतुकाची थाप

राज्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासाकरता महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुकाची थाप दिली आहे.

पंतप्रधानांकडून महाराष्ट्राला कौतुकाची थाप

नवी दिल्ली : राज्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासाकरता महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुकाची थाप दिली आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी लिहिलं आहे कि महाराष्ट्र सरकारने राज्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासाकरता केलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. यामुळे राहणीमान सुलभतेला तर चालना मिळेलच. शिवाय आणखी प्रगती साध्य होईल. गडचिरोली आणि जवळच्या परिसरातील माझ्या सर्व बंधू भगिनींचे विशेष अभिनंदन असे पंतप्रधान मोदी यांनी पोस्टमधून म्हटले आहे.

हेही वाचा : गडचिरोलीचे पालकमंत्रीपद पुन्हा फडणवीसांकडेच राहणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय पोस्ट केली?

दुर्गम आणि माओवादग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. यामुळे जीवन सुलभतेला निश्चितच चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग प्रशस्त होईल. गडचिरोली आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील माझ्या बंधू भगिनींचे विशेष अभिनंदन अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

 

 

 

 


सम्बन्धित सामग्री