Thursday, August 21, 2025 02:29:02 AM

अभिनेता अक्षय कुमारला दुखापत

अभिनेता अक्षय कुमारला दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. 'हाऊसफुल 5' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता अक्षय कुमारला दुखपत झाली असल्याचं समोर आलं आहे.

अभिनेता अक्षय कुमारला दुखापत

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारला दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. 'हाऊसफुल 5' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता अक्षय कुमारला दुखपत झाली असल्याचं समोर आलं आहे. हाऊसफुल हा प्रचंड गाजलेला आणि कॉमेडी चित्रपट आहे. त्यातच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते ती म्हणजे 'हाऊसफुल 5'  या चित्रपाची परंतु आता याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता अक्षय कुमारला दुखापत झाली असल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

नेमकं काय घडलं? 
'हाऊसफुल 5' या चित्रपटामधील एका स्टंट सीनचे चित्रीकरण सुरू होते. या दरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्यात काहीतरी गेल्यामुळे त्याला दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर लगेचचं नेत्रतज्ज्ञांना सेटवर बोलावण्यात आले. त्यांनी अक्षयच्या डोळ्यावर उपचार केले आणि त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी डोळ्यावर पट्टी बांधून काही काळ स्क्रीनसमोर काम करू नये असे स्पष्ट केले आहे.  

काय म्हणाले चित्रपटाचे निर्माते? 
 'हाऊसफुल 5' हा या फ्रेंचायझीमधील सर्वाधिक मनोरंजक चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटात हसवणूक करणारे विनोदी प्रसंग, मोठे अ‍ॅक्शन सीन आणि अचूक स्टंट्स आहेत. चित्रपटाची कथा एकाच वेळी विनोदी व गोंधळात टाकणारी असेल अशी माहिती चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली आहे. 

दरम्यान  'हाऊसफुल 5' या चित्रपाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता अक्षय कुमारला दुखापत झाल्याने त्याच्या चाहत्यांनी त्याला आराम करण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 
 


सम्बन्धित सामग्री