Wednesday, August 20, 2025 09:23:16 AM

Sonbhadra Diesel Tanker Video : डिझेल टँकर उलटला; मदत करायचं सोडून लोक बादल्या आणि मग घेऊन धावले..!

जेव्हा डिझेल टँकर उलटला, तेव्हा लोक जिवाची चिंता न करता घरातून बादल्या आणि मग घेऊन डिझेल गोळा करण्यासाठी आले, असे इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

sonbhadra diesel tanker video  डिझेल टँकर उलटला मदत करायचं सोडून लोक बादल्या आणि मग घेऊन धावले

Diesel Tanker Overturned In Sonbhadra Video : 'जिथे फुकट, तिथे आम्ही चिकट,' ही म्हण आपण सर्वांनी ऐकली असेलच.. असे फुकटे जरा कुठे काही मिळण्याची संधी दिसली की, लगेच धावत सुटतात. आपण काय करत आहोत, याचं भानही त्यांना राहत नाही. मोफत वस्तू उचलताना, लोक किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो, याकडेही बऱ्याचदा लक्ष देत नाहीत. सोनभद्रचा असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यामध्ये लोक डिझेल टँकर उलटल्यानंतर बादल्या आणि मग घेऊन डिझेल मिळवण्यासाठी आले आहेत. पण असे करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.

डिझेल हे अत्यंत ज्वलनशील इंधन आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या जवळची ठिणगी देखील आग पसरवू शकते. परंतु इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, जेव्हा डिझेल टँकर उलटला, तेव्हा लोक जिवाची चिंता न करता घरातून बादल्या आणि मग घेऊन डिझेल गोळा करण्यासाठी आले. ही घटना उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील आहे.

पेट्रोल टँकर उलटल्यानंतर गावकऱ्यांमध्ये शक्य तितके डिझेल घेण्याची स्पर्धा सुरू झाली. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला, तेव्हा गावकऱ्यांचा धाडस पाहून लोक अचंबित झाले. कमेंट सेक्शनमध्ये काही लोकांनी असे म्हटले आहे की, अशा प्रकारे जीव धोक्यात घालून डिझेल वाहून नेणे चुकीचे आहे. तर, अनेक वापरकर्त्यांनी लिहिले की, गावकरी असे करून योग्य काम करत आहेत.

हेही वाचा - Viral Video : काय हे.. मगरीला बाईकवर बसवलं..! असं बचावकार्य कधी कुणी पाहिलं नसेल..

डिझेल गोळा करण्यात गुंतलेले लोक...

या व्हिडिओमध्ये, गावाकडे जाताना एक डिझेल टँकर उलटलेला दिसतो. त्याच्याभोवती बादल्या घेऊन लोकांची गर्दी देखील दिसते.लोक पूर्णपणे निष्काळजीपणे बादलीत डिझेल भरताना दिसत आहेत. या दरम्यान, क्लिपमध्ये एक व्यक्ती 'अरे थांबा, इथून निघा' असे म्हणतानाही ऐकू येते.

सुमारे 24 सेकंदांची ही क्लिप यावर संपते. ज्याबद्दल वापरकर्ते कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या चिंता देखील व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ @SachinGuptaUP ने X वर पोस्ट केला आहे. ज्याला आतापर्यंत 11 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि सुमारे 500 लाईक्स मिळाले आहेत. तर पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

@SachinGuptaUP ने X वर व्हिडिओचे कॅप्शन दिले आहे - उत्तर प्रदेश: सोनभद्र जिल्ह्यात डिझेलने भरलेला टँकर उलटला. 20 हजार लिटर डिझेल रस्त्यावर सांडले. जवळच्या गावकऱ्यांनी बादल्या आणि मगांमध्ये डिझेल जमा करून घेतले.

हे अत्यंत धोकादायक आहे..
डिझेल टँकरमधून सांडलेले तेल गोळा करणाऱ्या लोकांच्या जीवाबद्दल वापरकर्ते कमेंट सेक्शनमध्ये चिंता व्यक्त करत आहेत. एकाने लिहिले - हे अत्यंत धोकादायक आहे, ट्रक उलटला आहे, कोणतीही ठिणगी त्याला पकडू शकते. अशा आपत्तीत संधी शोधू नये, नाहीतर स्वतःचे नुकसान होईल. दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले की माणूस प्रत्येक गोष्टीसाठी भुकेला असतो. तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले की लोकांना मोफत विष मिळाले, तरी ते तेही सोडत नाहीत, कारण त्यांना वाटते की, ते कधीतरी उपयोगी पडेल. चौथ्या वापरकर्त्याने लिहिले की, लोकांनी मदत करायला हवी होती. त्याऐवजी ते लुटमार करत आहेत.

हेही वाचा - Lover Video Viral : 'रात्री लपतछपत आलो.. फक्त 'तिला' भेटायला..! लग्न करायला थोडाच आलो होतो? असं कुठं असतं होय?'


सम्बन्धित सामग्री