छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजीनगरच्या देवगाव रंगारी येथे खाद्यतेलाची वाहतूक करणारा टँकर उलटला. राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहन वाचवण्याच्या प्रयत्नात टँकर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि तेलाने भरलेला टँकर उलटला.
खाद्यतेलाचा टँकर उलटल्याची माहिती पोलिसांच्या आधी स्थानिकांना मिळाली. मग काय कोणी डबा तर कोणी इतर भांडी घेऊन फुकटचं तेल मिळवण्यासाठी घटनास्थळी पोहोचलं. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच जास्तीत जास्त तेल मिळवण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उलटलेल्या टँकरमधील तेल शुद्धीकरणासाठी मालेगाव येथे जात होते. टँकर मालेगवाच्या दिशेने जात होता त्यावेळी अपघात झाला.
खाद्यतेलाचा टँकर पलटी झाल्याची माहिती पोलिसांच्या आधी आसपासच्या लोकांपर्यंत पोहोचली आणि च्या प्रयत्नात करत होते. छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावरील देवगाव रंगारी फाटा येथे कच्च्या तेलाचा टँकर पलटी झाला असून टँकर हे मालेगाव येथे तेल शुद्धीकरणासाठी जात असताना हा अपघात घडला.